पळसखेलमध्ये युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पळसखेल ता. आटपाडी येथील सचिन गंगाधर सावंत वय वर्ष 35 यांनी शुक्रवार दिनांक 1 जुलै 2022 रोजी स्वतःच्या घरातील छताच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सचिन सावंत शेतकरी होता. शेतीबरोबर शेतमजुरीचे काम सुद्धा करायचा. तो आईबरोबर एकटाच राहत होता .
आज सकाळी शेतातून काम करून घरी परत आला होता. घरात तो एकटाच होता. त्याचा मित्र काही कामानिमित्त त्याला फोन लावत होता, मात्र त्याचा फोन उचलला जात नव्हता, म्हणून मित्र घरी त्याची चौकशी करण्यास आला असता मित्राला घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सचिन दिसला, त्यावेळी मित्राने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. घटनेची माहिती पळसखेलचे पोलीस पाटील प्रकाश सावंत यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला .घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गावडे करीत आहेत.







