• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मी कष्टकऱ्यांचा, गोरगरीबांचा आमदार : सुर्वे……मागाठाण्यात प्रकाश सुर्वेंचे जोरदार स्वागत

माणगंगा by माणगंगा
July 7, 2022
in मुंबई
0
मी कष्टकऱ्यांचा, गोरगरीबांचा आमदार : सुर्वे……मागाठाण्यात प्रकाश सुर्वेंचे जोरदार स्वागत

मी कष्टकऱ्यांचा, गोरगरीबांचा आमदार : सुर्वे

मागाठाण्यात प्रकाश सुर्वेंचे जोरदार स्वागत

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई, दि. 7 – होय, मी भाजी विकायचो. भाजी विकणं गुन्हा आहे का ? कष्ट करणे गुन्हा नाही. माझ्या आईवडिलांनी कष्टाने-मेहनतीने भाजीचा व्यवसाय केलाय. ज्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला याच कष्टकरी जनतेने मला निवडून दिलेय. म्हणून मी कष्टकऱ्यांचा, गोरगरीबांचा आमदार आहे आणि पुढेही असेन, अशा शब्दांत मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात झालेल्या स्वागत सभेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्रात गेले दोन आठवडे सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर आपल्या विधानसभा क्षेत्रात परतलेल्या आमदार प्रकाश सुर्वे यांच्या स्वागतासाठी दहा हजारांपेक्षा अधिक कष्टकरी जनतेने, नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी गर्दी करून अनोखे शक्तिप्रदर्शन केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून दहिसर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयादरम्यान निघालेल्या स्वागत यात्रेने सारा परिसर भगवामय झाला होता. या उत्साहपूर्ण यात्रेत त्यांना साथ देण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के आवर्जून उपस्थित होते.

आज मागाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या स्वागतासाठी हजारो संख्येने झालेली गर्दी बोलकी होती आणि शिवसेनेच्या गोटात धडकी भरवणारी होती. विशेष म्हणजे या गर्दीतून आवाज कुणाचा… शिवसेनेचाच ! असा जयघोष घुमत होता. गुलाल उधळत, फुलांचा वर्षाव करीत सुर्वे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विभागातील नागरिकांचे, कष्टकऱ्यांचे आणि सैनिकांचे अभूतपूर्व प्रेम पाहून सुर्वेच नव्हे तर खासदार शिंदे आणि नरेश म्हस्केही अक्षरशः भारावले. सुर्वेंनी आपल्या भाषणात आपल्यावर भाजीवाला म्हणून केलेल्या टीकेचा समाचार घेतला. धंदा कोणताही असो, तो करणं म्हणजे गुन्हा नव्हे. मी भाजीवाल्याचा मुलगा आहे. मी भाजीवाला आहे.

याच भाजीवाल्यांनी, रिक्षावाल्यांनी, चहावाल्यांनी, गोरगरीबांना मला निवडून दिलेय. त्यांनी आज माझ्यावर जे प्रेम दाखवलेय, त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी असेन. तसेच मी उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांचा ऋणी आहे. त्यांनी मला संधी दिल्यामुळेच मी सेनेचा आमदार होऊ शकलो, अशा शब्दात सुर्वे यांनी त्यांचे मनापासून आभारही मानले. सुर्वे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या स्वागतासाठी उतरलेल्या जनसागराला पाहून खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, बंड पुकारलेल्या आमदारांचे मुंबईत कसे स्वागत होईल ते बघा असे सांगणाऱ्या प्रवक्त्याने मागाठाण्याच्या रस्त्यावर उतरलेले वादळ पाहून घ्यावे.

गेली अडीच वर्षे लोकांची कामं होत नव्हती. आपल्या आमदारांना वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यामुळे अशा सरकारबरोबर राहण्यात काहीच अर्थ नव्हता . म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी उठाव केला आणि हिंदुत्ववादी सरकार स्थापल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Views: 255
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
भाटपुरा विकासो चेअरमन पदी बन्सीलाल जैन

भाटपुरा विकासो चेअरमन पदी बन्सीलाल जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)