भाटपुरा विकासो चेअरमन पदी बन्सीलाल जैन
शिरपूर तालुक्यातील भाटपुरा विकास सोसायटीच्या चेअरमन पदी बन्सीलाल आगरचंद जैन तर व्हाईस चेअरमन पदी गजानन तुमडू कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. निवडीनंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील भाटपुरा विकास सोसायटीची निवडणूक मे महिन्यात झाली होती. १३ जागांसाठी झालेली ही निवडणूक चांगलीच चुरशीची झालेली होती. संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर दिनांक ७ जुलै रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. यात चेअरमन पदी बन्सीलाल आगरचंद जैन तर व्हाईस चेअरमन पदी गजानन तुमडू कोळी या दोघांचाच अर्ज असल्याने दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. बन्सीलाल जैन यांच्या अर्जावर सूचक म्हणून जनार्दन पाटील यांची तर अनुमोदक म्हणून अरुण चौधरी यांची सही होती.तर गजानन कोळी यांच्या अर्जावर सूचक म्हणून राजेंद्र करंकाळ यांची तर अनुमोदक म्हणून शांतीलाल पाटकर यांची सही होती.
यावेळी गजानन तुमडू कोळी, बंसीलाल आगरचंद जैन, शांतिलाल हिरालाल पाटकर, जनार्दन तानाजी पाटील, अरुण चंपालाल चौधरी, राजेंद्र मिठाराम पाटील, मिश्रीलाल मोहन वंजारी, नूतन सुरेश पाटील, बेबीबाई रणसिंग राठोड, राज हिरालाल पाटील,आत्माराम उत्तम माळी व हिरामण भिका भिल हे संचालक उपस्थित होते.चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडी नंतर ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन सोनवणे, चतुर देवरे, विनोद जैन, भरत राठोड, आप्पा भिल,संजय भिल यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोनार उपस्थित होते.त्यांना सचिव सुधाकर पाटील यांनी मदत केली.
निवडून आलेल्या नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रभाकरराव चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.







