कार्यकुशल, कर्तृत्वसंपन्न,कुशल संघटकाचा यथोचित सन्मान, श्री जितेंद्र दगडू दादा सकपाळ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी बिनविरोध निवड….!
युनिव्हर्सल ह्यूमन राईट कौन्सिल चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.डॉ.तरुणजी बाकोलिया, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ.डॉ.सुमनजी मौर्य, यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णा ताई कदम यांच्या सहकार्याने काम करत असताना सध्याचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा. जितेंद्र दगडू सकपाळ यांची संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी पदोन्नती झाली ,
मा.जितेंद्र सकपाळ हे प्रथम संघटनेमध्ये मुंबई सचिव या पदावर कार्यरत होते , अल्पावधीतच जितेंद्र दादांनी आपल्या संघटन कौशल्याने युनिव्हर्सल ह्यूमन राईट कौन्सिल संघटना वाढीसाठी अहोरात्र कष्ट घेऊन संघटना संपूर्ण महाराष्ट्रात रुजू केली या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय कार्यकारिणीने दादांना UHRC च्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली या संधीच देखील दादांनी सोनं केलं , कार्याध्यक्ष पदावर काम करत असताना UHRC संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संपर्क साधून संघटनेच्या ध्येय उद्दिष्टे यांची चर्चा करून अनेक कार्यक्रम पार पाडण्यासाठी सतत प्रयत्न करत असणारे दादा, कोरोना काळात तर दादांनी अहोरात्र कोरोना रुग्णांना आपल्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मदत करण्यासाठी प्रयत्न केले मग ते रॅमिडिसीवीर इंजेक्शन असो , ICU बेड असो किंवा भरमसाठ हॉस्पिटलच्या बिलाबाबत आवाज उठविणे असो नेहमीच त्यांनी कोरोना रुग्णांना मदत केली आहे,
जितेंद्र दादांना समाजकार्याचे बाळकडू लढउपणा लहानपणापासून च त्यांच्याच घरी त्यांचे वडील व संपूर्ण महाराष्ट्रास परिचित असणारे मा.बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक लढवय्ये शिवसैनिक माजी आमदार मा.दगडू(दादा) सकपाळ यांच्या कडून मिळाले,
जितेंद्र दादांनी देखील आपल्या वडिलांचा स्वच्छ आणि प्रामाणिक सामाजिक कार्याचा वारसा जपला आहे,
सध्या जितेंद्र दादा UHRC संघटनेच्या च्या कार्याबरोबरच इतर विविध राज्य,राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक संघटनेशी जोडलेले आहेत, त्यांची राजकीय सूर्वताच झंझावाती आहे यामध्ये शिवसेना जावली विधानसभा संपर्कप्रमुख, सातारा जिल्हा शिवसेना सचिव, सहसचिव भारतीय कामगार सेना, भारतीय विद्यार्थी सेना मुंबई चिटणीस, उपाध्यक्ष हिंदुस्थान माथाडी आणि जनरल कामगार सेना, अशा अनेक सामाजिक संघटनेमध्ये विविध पदावर काम करून समाजकार्य करतानाच प्रचंड राजकीय अनुभव मिळवला आपल्या वडिलांचा सामजिक कार्या चा वारसा जपत जितेंद्र दादा कार्यरतआहेत, मा. जितेंद्र दादांच्या कुशल संघटन नेतृत्वाचे गुण पारखून संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री.डॉ.तरुणजी बाकोलिया, महिला राष्ट्रीय अध्यक्षा सौ.डॉ.सुमनजी मौर्य यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णा ताई कदम यांच्या शिफारशी नुसार राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांना UHRC राज्य संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून योग्य आणि कणखर नेतृत्वाचा यथोचित सन्मान केला आहे,,मा. जितेंद्र दादा ना आपल्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढील वाटचालीस मुंबई च्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा
धन्यवाद
महेश्वर तेटांबे
पत्रकार
९०८२२९३८६७