• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

“धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, त्याचाही राग माझ्यावर होता” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माणगंगा by माणगंगा
July 15, 2022
in मुंबई
0
“धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, त्याचाही राग माझ्यावर होता” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, त्याचाही राग माझ्यावर होता” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माणगंगा न्यूज

धर्मवीर आनंद दिघे सिनेमा काढला. तुम्हाला आवडला पण काही लोकांना पचला नाही. त्याचाही राग होता. कुणाला आवडो न आवडो मी पर्वा करत नाही. धर्मवीर आनंद दिघेंसाहेबांनी बाळासाहेंबांना गुरू मानलं.आज आम्ही बाळासाहेबांचे, धर्मवीरांचे विचार घेऊन पुढे चाललोय. आम्ही हा निर्णय का घेतला त्याचं आत्मपरिक्षण करण्यापेक्षा गद्दार, बंडखोर म्हटलं जातं.

हा बंड नव्हे, उठाव आहे, क्रांती आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही घेतलेला निर्णय हा शिवसेनेला, शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आहे. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केला आहे. जेव्हापासून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून शेकडो लोकं पाठिंबा द्यायला येतायेत. आम्ही रक्ताचं पाणी करून, जिवाचं रान करून, कष्ट घेऊन शिवसेना वाढवली.

जे बोलतात त्यांच्या अंगावर किती केसेस आहेत? आम्ही जेल भोगलीय. १०० हून अधिक केसेस अंगावर घेतल्यात. धर्मवीर आनंद दिघेंनी ठाणे, पालघर जिल्ह्यात इतिहास घडवला.

दिघेंनी उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवलं. योग्यवेळी सगळं काही सांगेन असा त्यांनी सांगितले. त्याचसोबत कामाख्या देवीने महाविकास आघाडीचा बळी दिला. देवीलाही ते आवडलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नाही. कामाख्या देवीच्या मंदिरात गेलो होतो.

आम्ही सगळे एका रांगेत होतो. तेव्हा रांगेतील एक मुलगी म्हणाली काय डोंगर, काय झाडी. शहाजीबापू इतके प्रसिद्ध झालेत. अत्यंत खेळीमेळीचे वातावरण गुवाहाटीत होते. शहाजीबापूंच्या कलागुणांना वाव मिळाला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी चांगला पाहुणचार केला. १५ दिवसांच्या त्या अनुभवावर सिनेमा निघू शकतो.

आमच्याकडे चर्चा करायला माणसं पाठवली, इकडे पुतळे जाळत होते, पदावरून हटवत होते. दगडफेक करायला सांगितलं पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगडफेक करायला पुढे कोण येणार? एकनाथ शिंदे यांनी मधमाशासारखी माणसं जोडली आहेत. ती सोडली तर पळताभुई थोडी होईल असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

पांडुरंगाची पूजा करण्याचं भाग्य मिळालं

मी दिल्लीहून पुण्यात उतरलो, पंढरपूरला चाललो होतो तेव्हा रस्त्याच्या शेजारी दुतर्फा स्वागतासाठी लोकं जमली होती. आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मला मिळाला हे भाग्याचं आहे. आपण जी विकासाची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका घेतली त्याला लोकांनी साथ दिली. पंढरपूर देवस्थान तिरूपती बालाजीसारखं झाल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरचा विकास आराखडा बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.

Views: 245
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पाणीपुरवठ्याच्या टाकीत गाळ झाल्याची गंगाखेड नगरपालिकेची कबुली

पाणीपुरवठ्याच्या टाकीत गाळ झाल्याची गंगाखेड नगरपालिकेची कबुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)