• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पाणीपुरवठ्याच्या टाकीत गाळ झाल्याची गंगाखेड नगरपालिकेची कबुली

माणगंगा by माणगंगा
July 15, 2022
in महाराष्ट्र
0
पाणीपुरवठ्याच्या टाकीत गाळ झाल्याची गंगाखेड नगरपालिकेची कबुली

पाणीपुरवठ्याच्या टाकीत गाळ झाल्याची गंगाखेड नगरपालिकेची कबुली

गंगाखेड -प्रतिनिधी

गोदावरी पात्रातून शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत गाळ झाला असून ब्लिचिंग पावडर व तुरटी टाकून शहरवासीयांना पाणीपुरवठा करत असल्याची कबुली नगरपालिकेने निवेदन करते आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना पाठवलेल्या लेखी पत्राद्वारे दिली.

सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गंगाखेड नगरपालिके कडून शहर वासियांना गढुळ व दूषित पाणीपुरवठा केला जात असून स्वच्छ पाणीपुरवठा साठी नगरपालिकेला आदेशित करावे अशी लेखी विनंती पत्राद्वारे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना पाच जुलै रोजी केली होती. या पत्रावर उपविभागीय अधिकाऱ्याने कार्यालयाने नगरपालिकेला लेखी पत्र व्यवहार करून या पत्रानुसार तात्काळ कार्यवाही करून कार्यालयास अहवाल सादर करावा अशी आदेशित करण्यात आले होते.

यानुसार नगरपालिका कार्यालयाने 14 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी व निवेदनकर्ते आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना लेखी प्रतिउत्तर पाठवले. मुळी बंधारा गोदावरी पात्र पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीत जीर्ण अवस्थेत आहे. तरी गोदावरी पात्रातील पाण्याची टाकी येथून ब्लिचिंग पावडर व तुरटी टाकून दैनंदिन पाणीपुरवठा केला जात आहे. जॅकवेल व पाण्याच्या टाकीमधून गाळ काढण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम कार्यालयाकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

एकूण या पत्राद्वारे आजपर्यंत नगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांना गाळयुक्त पाणीपुरवठा केल्याची कबुलीच नगरपालिकेने दिली आहे. एकूणच आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी अवस्था नगरपालिकेची झालेली आहे. गाळ पाण्याच्या टाकीत झाला असताना तो गाळ काढण्या ऐवजी त्या टाकीत ब्लिचिंग पावडर आणि तुरटी टाकून तसाच पाणीपुरवठा मागील चार महिन्यापासून केला जात आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या टाकीतील गाळ काढणे सोपे असतानाही नगरपालिकेने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. एकूणच पिण्याचा पाणीपुरवठा करण्यावरील खर्च वाढवून गुत्तेदाराचे भले करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने चालवला आहे.

Views: 131
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ग्रामीण भागातील तरुणांची गरुड झेप प्रा.नारायण खरजे यांची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र मधील ऐरोली व बेलापूर विधानसभा निरीक्षक पदी निवड.

ग्रामीण भागातील तरुणांची गरुड झेप प्रा.नारायण खरजे यांची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र मधील ऐरोली व बेलापूर विधानसभा निरीक्षक पदी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)