राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या उपक्रमाची घोषणा !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुबंई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या उपक्रमाची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. आज या उपक्रमातंर्गत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री मा. धनंजय मुंडेसाहेब यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. “आदरणीय पवार साहेबांच्या विशेष प्रयत्नातून राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेत आले. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के नागरीकांशी निगडीत असलेल्या विभागाची जबाबदारी माझ्यावर दिली. पदभार स्वीकारल्यानंतर इंदू मिल येथे होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची शंभर फुटाने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला”, असे निवेदन मुंडे साहेब यांनी केले. सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांना कशाप्रकारे न्याय दिला, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
तसेच १५ जुलै रोजी मुंडेसाहेब यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छांचा वर्षाव पाहून मुंडे यांनी सर्व हितचिंतकांचे आभार मानले. “कोरोना महामारी संपलेली नाही. सर्वांनी सुरक्षित राहावे, मास्क वापरावा, स्वत:ला सुरक्षित ठेवले, तरच आपण आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो”, असा संदेशही सर्वांना दिला. यावेळी लाईव्हदरम्यान विचारल्या गेलेल्या अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत ना.धनंजय मुंडेसाहेब यांनी जनतेशी संवादही साधला.