• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुख्यमंत्री ​एकनाथ शिंदें यांना डॉक्टरांनी दिला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला !सततच्या धावपळीने तब्येत बिघडली

माणगंगा by माणगंगा
August 4, 2022
in मुंबई
0
मुख्यमंत्री ​एकनाथ शिंदें यांना डॉक्टरांनी दिला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला !सततच्या धावपळीने तब्येत बिघडली

मुख्यमंत्री ​एकनाथ शिंदें यांना डॉक्टरांनी दिला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला !

सततच्या धावपळीने तब्येत बिघडली

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. सततचे दौरे आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या सभा यांमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून शिंदेंना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांनीही आजचे सर्व कार्यक्रम तातडीने रद्द केले आहेत. फडणवीस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक चिन्हाबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला दिल्याने भाजप सावध पावलं टाकण्याच्या पवित्र्यात असल्याचं चित्र आहे.

एकनाथ शिंदे यांनी २० जूनला बंड पुकारल्यानंतर सुरत-गुवाहाटी-गोवा असे त्यांचे मार्गक्रमण सुरु होते. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. ३० जूनला मुंबईत येऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांचे सतत दौरे, सभा, भाषणं, पत्रकार परिषदा असे अतिव्यस्त वेळापत्रक पाहायला मिळत आहे.

गेल्या महिनाभरात रात्री-अपरात्री असोत, एक-दोन दिवसांचे असोत, तर कधी उघड आणि कधी गुप्त असे झालेले दिल्लीचे दौरे असोत, पंढरपूर वारी, महाराष्ट्र दौरा यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर ताण आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक दिवस सक्तीचा आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिंदेंनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आणखीनच लांबवणीवर पडला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन अमित शहा आणि जे.पी.नड्डा यांना भेटू शकतात. या भेटीत आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी करायचा, याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ८ ऑगस्टला होणार असल्याची चर्चा आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगालाही तूर्तास कोणताही आदेश घेण्यास मनाई केल्याने शिंदे गट काहीसा बॅकफूटवर जाऊ शकतो. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार ठरलेल्या वेळी होणार की आणखी लांबणीवर पडणार, हे आता फडणवीसांच्या दिल्लीवारीत निश्चित होऊ शकते.

Views: 107
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव महसूल उपविभाग शिरपूर अंतर्गत कर्मचाऱ्यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)