स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव महसूल उपविभाग शिरपूर अंतर्गत कर्मचाऱ्यांचा गौरव
त-हाडी- श्री.एस.एम.पटेल हॉल फॉर्मसी कॉलेज शिरपूर येते दिनांक 05-08-2022 सकाळी 11.00 वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महसूल दिवस साजरा करण्यात येत आहे.
शिरपूर उपविभागीय अधिकारी श्री .प्रमोद भामरे व तहसिलदार शिरपूर श्री.आबा महाजन यांच्या हस्ते शिरपूर तालुक्यातील महसूल विभागात सन 2021-2022 या वर्षाभरात उल्लेखनिय कामगीरी करणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवुन गौरविण्यात येणार आहे. त्यात श्रीमती प्रजाक्ता सोमलकर पुरवठा निरीक्षण अधिकारी,श्रीमती मनिषा जाधव मंडळ अधिकारी अर्थे भाग,श्री.बाळू सानप तलाठी अजनाड,श्री.भटेसिंग बोरसे अव्वल कारकुन पुरवठा विभाग,श्री.जयेश धाकड महसूल सहायक,श्री.पवन कोळी शिपाई तहसिल कार्यालय,श्री.राजू कोळी कोतवाल तऱ्हाडी त.त यांचा समावेश राहिल.






