• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा, शनिवारपासून तीन दिवस घरांवर तिरंगा फडकवा …….भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस मा. विनोद तावडे यांचे आवाहन

माणगंगा by माणगंगा
August 12, 2022
in मुंबई
0
हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा, शनिवारपासून तीन दिवस घरांवर तिरंगा फडकवा …….भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस मा. विनोद तावडे यांचे आवाहन

हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा, शनिवारपासून तीन दिवस घरांवर तिरंगा फडकवा …….भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस मा. विनोद तावडे यांचे आवाहन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच असे प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे अभियान होत आहे. राज्यातील सर्व घरांवर दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकावून सर्वांनी यामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. विनोद तावडे यांनी शुक्रवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत केले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, आशीष कुलकर्णी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके, उत्तर भारतीय मोर्चाचे संयोजक डॉ.संजय पांडेय उपस्थित होते.

मा. विनोद तावडे म्हणाले की, १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरातल्या २० कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. हा जनतेचा कार्यक्रम आहे. लोक स्वत: पुढाकार घेत तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी आजपासूनच घरावर तिरंगा लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा हे अभियान यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

ते म्हणाले की, आम्ही देशातल्या युवकांना सांगू इच्छितो की, हर घर तिरंगा हे तुमचे अभियान आहे. या अभियानासोबत जोडून आपल्या घरी तिरंगा फडकावून www.harghartiranga.com या संकेतस्थळावर फोटो अपलोड करावा. तिरंगा यात्रेमुळे देशाच्या तरूणांमध्ये देशभक्ती जागृत होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला सर्व क्षेत्रामध्ये सर्वोच्च पातळीवर अग्रणी ठेवण्याचा संकल्प करण्याचे हे वर्ष आहे.

त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशभरात ९ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान ‘हर घर तिरंगा अभियान’ राबवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या अभियानामुळे सर्व भारतीय हे एका धाग्यात विणले जात आहेत. मा. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ‘हर घर अभियाना’ विषयीच्या मार्गदर्शन सुचना दिल्या होत्या.

९ ऑगस्ट २०२२ ते ११ ऑगस्ट २०२२ दरम्यान अमृत महोत्सवी वर्षा संबंधी जनजागृती करण्यासाठी, देशप्रेमाची भावना वाढीस लागावी यासाठी तिरंगा यात्रा काढणे, ठिकठिकाणी फलक लावणे यासारखे उपक्रम राबवले. देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यांमध्ये तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. या सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्टच्या कालावधीमध्ये प्रत्येक वॉर्ड किंवा गावांमध्ये ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन आणि ‘वंदे मातरम’ या गीतासह प्रभात फेरी काढण्यात येत आहे. आज देशातल्या लाखो गावांमध्ये प्रभात फेऱ्या काढल्या होत्या. तर ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशभरात महापुरूषांच्या स्मारकावर स्वच्छता अभियान राबवले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Views: 389
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
रेशन दुकानदारांवर प्राणघातक हल्लाप्रकरणी कारवाईची मागणी करत तहसिलदारांना दिले निवेदन.

रेशन दुकानदारांवर प्राणघातक हल्लाप्रकरणी कारवाईची मागणी करत तहसिलदारांना दिले निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)