जामनेर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे महागाई विराेधात सायकल आंदोलन !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
जळगाव: आज दिनांक 13 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता पळसखेडा बुद्रुक येथून ते भुसावळ रोड पेट्रोल पंप पर्यंत वाढते इंधन गॅस, पेट्रोल, डिझेल खाद्य तेलाच्या विरोधामध्ये आणि तसेच मोदी सरकार यांच्या विरोधामध्ये वाढत्या भावामुळे सामान्य जनतेचे होणारे हाल लक्षात घेऊन आज जामनेर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे सायकल आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन सरासरी पाच किलोमीटर चे झाले असून यामध्ये जामनेर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते उपस्थित होते. यावेळेस जामनेर काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष श्री.शरद पाटील, प्रदेश सदस्य श्री. मुलीचं नाईक, श्री. विजय पाटील, श्री. गणेश माळी, श्री. संदीप पाटील, मुसा पिंजारी, सुभाष परदेशी, रफिक मौलाना , फक्रुद्दीन शेख ,नाना पाटील, गणेश झाल्टे, संजय राठोड, प्रवीण पाटील, डॉ. यश राठोड, कु. मेदक्षा राठोड उपस्थित होते.