बंकटस्वामी विद्यालय खडकीघाट शाळेत सरपंच याच्या अध्यक्षतेखाली वर्ग 8 वी ते वर्ग 10 वी शाळा सुरू करण्यासंंबंधी बैठक .
खडकीघाट–
-बीड तालुक्यातील खडकीघाट ता.जि.बीड येथील श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या बंकटस्वामी विद्यालयात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली वर्ग 8 वी ते वर्ग 10 वी चे वर्ग सुरू करण्यासाठी मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांनी बैठक घेतली .या बैठकीसाठी सरपंच सौ.पुनम गिरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री रामदास खोसे दादा ,वैधकिय कर्मचारी श्री मांडवे साहेब,सौ.संगीता थोरात मॕडम , ,बोराडे काकू ,तलाठी भाऊसाहेब श्री ओव्होळ साहेब ,पालक श्री दिनेश भोसले आणि पञकार श्री शशिकांत देशमुख श्री सचिन बोराडे यांचा शाळेच्या वतीने छोटया खाणी सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला
.याप्रसंगी आरोग्य कर्मचारी श्री मांडवे साहेब यांनी शाळा भरविण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे सांगून अरोग्य विभागाच्यावतीने पाहिजे ते सहकार्य करु सांगितले .तसेच शाळेत मु.अ.सावंत सर यांनीही शाळेत आल्यावर आम्ही विद्यार्थ्यांची काळजी घेऊ असे सांगितले तसेच शाळेत स्वच्छता ठेवून कोरोनाचे नियम काटेकोरपणे आम्ही शिक्षक मंडळी पाळून विद्यार्थ्यांच्या अरोग्याची काळजी घेऊ सांगितले या प्रसंगी सर्व शिक्षक श्री उंदरे सर,श्री सुपेकर सर,श्री रिंगणे सर श्री आनेराव सर श्री मोरे सर श्री खाकरे सर श्री मांजरे सर श्री कुरे सर श्री बनसोडे सर श्री सुरेश भोसले सर श्री कानडे बाबुराव श्री कल्याण अनंञे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री सुरेश बापू यांनी केले तर आभार श्री संभाजी उंदरे सर मानले.व कार्यक्रम संपला.