पंढरपुर तालुक्यातील कारखान्यांच्या झोपलेल्या चेअरमन आणि संचालक मंडळाला जागे करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार हालगीनाद आंदोलन
पंढरपुर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व इतर कांही साखर कारखान्यांकडे थकीत FRP ,कामगारांचे पगार आणि तोडणी वाहतूकीची बिले प्रलंबित आहेत
गेल्या अनेक दिवसांपासून कारखान्याची बिल थकीत आहेत परंतु कोरोना, लाॅकडाऊन, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना कारखाना प्रशासनाने वेठीस धरले आहे शेतकरी कारखाना कार्यस्थळावर येऊन ऊस बीलासाठी विष पेऊ लागले तरीही चेअरमन व संचालक मंडळ गाढ झोपी गेले आहे,शेतकऱ्यांनी ऊस घातला पण बिल देताना कुणीच जबाबदारी घेत नाही त्यामुळे शेतकरी कामगार व तोडणी वाहतूक ठेकेदार यांना पैसे कुणाला मागायचे असा प्रश्न पडला आहे .या संदर्भात पंढरपुर चे प्रांताधिकारी श्री सचिन जी ढोले साहेब यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील,जिल्हा संघटक शहाजहान भाई शेख, सचीन आटकळे, सुलतान भाई शेख उपस्थीत होते
तरी 15/7/2021 रोजी सकाळी 11:00 वाजता शेतकरी कामगार व तोडणी वाहतूक ठेकेदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे