ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त नेकनुर येथे भव्य रक्तदान सह विविध कार्यक्रम
नेकनुर दि १३ (प्रतिनिधी ) राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नेकनुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व ना. धनंजय मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेकनुर शहर व बालाघाटाच्या वतीने करण्यात आले आहे.
ना. धनंजय मुंडे साहेब यांचा वाढदिवस दि. १५ जुलै रोजी संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने बालाघाटावर नेकनुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दि. १५ जुलै रोजी सकाळी १० ते २ वाजे पर्यंत स्त्री व कुटीर रुग्णालय नेकनुर येथे भव्य रक्तदान शिबीर,रुग्णांना फळांचे वाटप, वृक्षारोपण, ह. भ. प. बंकटस्वामी महाराज मठात अभिषेक, दर्गा हजरत सय्यद शाह इब्राहिम शहीद रहे येथे चादर चढवून साजरा करण्यात येणार आहे. तरी नेकनुर व संपूर्ण बालाघाटावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व ना. धनंजय मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवून सर्व कार्यक्रम यशस्वी करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेकनुर शहर व बालाघाटाच्या वतीने करण्यात आले आहे.