अलिबागमधे बोगस खरेदी विक्री व्यवहार ? पोलीस तक्रार दाखल
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
रायगड जिल्हा: अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत 2012-13 दरम्यान अगरवाल नावाच्या खरेदीदारांनी एकूण पाच स्थानिक रहिवाशांची मालमत्ता खरेदी केल्याचे दस्तऐवज बनविले आहेत. प्रत्यक्षात ज्या घरांचा विक्री व्यवहार दाखविण्यात आला आहे ती घरेच अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक आरोप या परिसरातील इतर व्यक्तींकडून करण्यात येत असून, त्याबाबतची कागदपत्रे Free Press Online News कडे आहेत.
आश्चर्य म्हणजे जी घरे अगरवाल यांना तब्बल चाळीस लाखांना विकल्याचा व्यवहार दाखविण्यात आला आहे, ती घरे अस्तित्वात नसतानाही ती अस्तित्वात आहेत असे दाखले नासिकेत कावजी या तत्कालीन सरपंचाने दिले व या बोगस व्यवहारात साथ दिली. तत्कालीन ग्रामसेवकही झोपला होता. याचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.
मात्र, सदर व्यवहाराची सखोल चौकशी करून बोगस कागदपत्रांच्या आधारे आर्थिक घोटाळा केल्याबद्दल नरेश अगरवाल व इतर, नासिकेत कावजी, तत्कालीन ग्रामसेवक आणि विक्री करणारे मुळे, खंडाळे परिसरातील रहिवासी पांडुरंग दशरथ पाटील व इतर चारजण यांचेविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही आजच अलिबाग पोलीसांना तक्रार दिली आहे. त्यासोबतच संबंधित *खंडाळे ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकाला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्यासाठीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.
लवकरच मिनी गोव्यामधे हा मिनी घोटाळा करून गैरमार्गाने मनी खिशात घालणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू अशी माहिती दिली श्री. रमेश नामदेव देवरूखकर,
पत्रकार यानी.