रमाई योजने मधून दिघंची साठी 71 घरकुले मंजूर सरपंच अमोल मोरे यांची माहिती
आटपाडी/प्रतिनिधी
रमाई घरकुल योजने मधून दिघंचीसाठी तब्बल 71 घरकुलां ना मंजुरी मिळाल्याची माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली.एक ही नागरिक बेघर राहू नये यासाठी शासनाच्या घरकुल योजना दिघांची मध्ये प्रभावी पणे राबवल्या आहेत.त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा करत 71 घरकुल मंजूर केले.
दिघंचीच्या इतिहासात प्रथम च घरकुल च्या विविध योजनेमधून सगळ्यात जास्त घरकुल योजनेचा लाभ दिघंची मधील नागरिकांना मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे मत सरपंच अमोल मोरे यांनी व्यक्त केले.यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर,तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील तसेच जिल्हा पसरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैय्या बाबर तसेच समाजकल्याण सभापती प्रमोद आप्पा शेंडगे यांची मोलाची मदत लाभली.
घरकुल योजनेसाठी सर्व्हे करून जागेचे फोटो काढणे,त्याला ऑनलाईन करणे,सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पूर्तता करून घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण करून शासन नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देत असतो.
याकामी ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत च्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.नागरिकांना हक्काचे घर मिळत आहे याचा आनंद असून आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे देखील सरपंच अमोल मोरे यांनी नमूद केले.