टेकवाडे प्राथमिक शाळेत गणेश चतुर्थी निमित्त गणपती बनवणे स्पर्धा संपन्न


शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते 4 थी च्या विद्यार्थ्यांसाठी गणेश चतुर्थी च्या निमित्ताने मातीचा गणपती बनवणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.



मुख्याध्यापक आर.बी.खोंडे यांनी सदर स्पर्धेतून विद्यार्थ्यांमधील शिल्पकला विकसनाला वाव मिळणे व विद्यार्थ्यांना अध्यात्मिक संस्कार देणे हा उद्देश असल्याचे पालकांना सांगितले या स्पर्धेसाठी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पालकांनी या कामी आपल्या पाल्यांना मदत केली.उपक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय पटेल बालवाडी शिक्षिका एस.जे.सोनार शिक्षकेतर कर्मचारी श्री बी.एल.पावरा,श्री ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.







