श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केले आपले मनाेगत !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, मा.गृह मंत्री श्री दिलीप वळसे पाटील, मा.उप मुख्यमंत्री श्री अजित पवार याना जय हिंद !!
आदरणीय महोदय पोलीस दलातील भ्रष्टाचार,मनमानी कारभार, गुन्हेगारी जगताशी संबंध असणाऱ्या काही ठराविक सनदी अधिकारी, इतर विविध पदांवरील म पो से पदांवरील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यावर आपला वरदहस्त असल्याची अनेक उदाहरणे वयक्तिक माझ्यास कडे नक्कीच उपलब्ध आहे.पोलीस दलाचे गुन्हेगारी करण करण्यात सर्वात मोठं योगदान कोणाच असेल तर आपल्या राजकारण्यांच्या पाठबळा शिवाय हे शक्य नाही हे माझे ठाम मत आहे.
आता यातली गंभीर प्रकरणातील भ्रष्टाचार कारभार करणाऱ्या पोलीस निरीक्षक आनंद भोईर, तात्कालिन नेमणूक गुन्हे शाखा मुबंई, सद्याची नेमणूक पूर्व नियंत्रण कक्ष मुंबई व दहिसर परिसरातील आनंद ढाबा याचे मालक यांच्या कारनाम्या कडे येऊ या पोलीस निरीक्षक आनंद भोईर याना 22 लाख रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले होते.
मात्र या गंभीर प्रकरणांत त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले मात्र तो खटला मे न्यायालयात दाखल असल्याने त्याचा निकाल न लागल्याने,विशेषतः मुंबई, महाराष्ट्र राज्य पोलीस दल, व इतर शासकीय विभागात नोकरी करणारे व जे भ्रष्टाचार कारभारात लिप्त असून अशा भ्रष्टाचार लोकसेवक यांना भ्रष्टाचार करताना पकडल्या नंतर त्यांच्यावर बडतर्फ कारवाई करण्यात आलेली नाही मग माझ्यावरच का?हा रोकडा सवाल पोलीस निरीक्षक आनंद भोईर यांनी या व्यवस्थेतील सर्वाना च विचारला असून तो येथील मे न्यायालय यांना ही विचारला आहे आणि त्यांच्यावर झालेली बडतर्फ कारवाई योग्य नाही हे ही त्यांचे म्हणणे आहे शिवाय त्यांनी ठाणे मुंबई कार्य क्षेत्रातील अनेक क्लीस्ट गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने केलेला असून ट्रॅक रेकॉर्ड अतिशय उत्कृष्ट,कामगिरीचा आहे त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेली बडतर्फ ची कारवाई नियमांचे उल्लंघन करणारी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेले आहे एकंदरीत पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार/सनदी अधिकारी यांच्यावर बडतर्फ कारवाई करणे नियमबाह्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे
याच बृहन्मुंबई पोलीस दलातील मा.पोलीस सह आयुक्त (प्रशासन) श्री राजकुमार जी व्हटकर यांनी सांगितले की सदर पोलीस निरीक्षक आनंद भोईर याना पुन्हा पोलीस दलात रुजू करण्या करता मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचा कायदेशीर विरोध होता परंतु तत्कालीन मंत्री रणजित पाटील यांनी पोलीस निरीक्षक आनंद भोईर याना पुन्हा पोलीस सेवेत रुजू करण्याच्या कार्यप्रणाली ला संमती दिल्याने पोलीस निरीक्षक आनंद भोईर यांना महाविकास आघाडी सरकारने पुन्हा पोलीस दलात सन्मानाने घेण्याची तजवीज करून आदेश दिले त्यामुळे त्यांना पोलीस दलात रुजू केले आहे.
वरील सर्व मा.मंत्री महोदय, राज्य शासन यांना विनंती आहे की 22 लाख रुपये लाच घेणारे पोलीस निरीक्षक आनंद भोईर हे जर तुमच्या व कायद्याच्या नजरेतून पारदर्शक शिक्षेस पात्र नसतील तर?प्रामाणिक,कर्तव्य कठोर,इमाने इतबारे शासकीय नोकरी करणारे पोलीस अधिकारी/कर्मचारी हे भ्रष्टाचार करणारे आहेत का? माझं खुले आव्हान आहे आपल्या सर्वाना पोलीस निरीक्षक आनंद भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करणारे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांनी पोलीस निरीक्षक आनंद भोईर यांच्यावर 22 लाख रुपयांची लाच घेताना केलेली कारवाई खरी किंवा खोटी याची योग्य माहिती,चौकशी,तपास आपण सर्वजण कडून खरा प्रकार सर्व सामान्य जनते पर्यंत ला जाहीर करणार का? एकंदरीत सद्या गाजत असलेले सचिन वाझे गँग प्रकरण कमी की काय म्हणून राजकीय नेते व पोलीस दलातील भ्रष्टाचार कारभार करणारांच्या अभद्र युतीची ही कर्म कहाणी जगा समोर आणली पाहिजे या उदात्त हेतूने ही तक्रार मी आपल्या सर्वांना करत आहे याची योग्य चौकशी व योग्य कारवाई होणे करता माझी कायदेशीर तक्रार या माध्यमातून मी आपणांस व आपल्या राज्य शासन व पोलीस दलास गृह विभागास करत आहे कारण सद्या महाराष्ट्र राज्य शासन मंत्रालय मुंबई येथे तक्रार घेऊन येणाऱ्या सर्व सामान्य माणसाला प्रवेश बंदी आहे यास्तव या माध्यमातून लेखी तक्रार करत आहोत, जयहिंद !!
श्री जगदीश का. काशिकर हे या विचारांशी पुर्ण सहमत आहेत कारण त्यांनीसुध्दा तसा अनुभव घेतला आहे मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटी बाबत !!
श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व मंबई महानगरपालिकेला समस्येबाबत अवगत करून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी तसेच निगडीत शासकिय प्रशासनास दिली आहे व काेमल रहिवाशीची समस्या सुटण्यासाठी त्वरीत हस्तक्षेप व गुन्हेगारयांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे या देशातील सर्व जागरूक भारतीय जनतेने/नागरिकांनी कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुघँटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेऴ आली आहे !!