राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ उपक्रम
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या उपक्रमांतर्गत आज राज्यमंत्री ना. दत्तात्रयमामा भरणे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. प्रामाणिक कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी मला श्री. छत्रपती सहकारी साखर कारखान्यात संचालकपदाची जबाबदारी दिली. सामान्य माणसाच्या हितासाठी काम करण्याची शिकवण दिली. सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेण्याची शिकवण मला पक्षश्रेष्ठींकडून मिळाली, असे दत्तात्रय भरणे म्हणाले. त्यांच्या राजकीय वाटचालीचा आलेख त्यांनी चर्चेदरम्यान मांडला.
राज्यावर आलेले कोरोना महामारी चे संकट, वादळे, अतिवृष्टी अशा अनेक संकटांचा महाविकास आघाडी सरकारने समर्थपणे मुकाबला केला. अशाप्रकारे पुढेही राज्यातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत राहू असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी जनतेला दिला. यासोबतच जनतेने विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत ना. मामा भरणे यांनी जनतेशी संवाद साधला.