जामनेर महिला काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा जाहीर निषेध !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
आज सर्वसामान्य महिलांच्या पेट्रोल पंपावर उपस्थित होत्या. त्यांच्याकडून जाणून घेतले आहेत गॅस सिलेंडर चे भाव तसेच पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल यांचे दिवसेंदिवस वाढणारे भाव. हे सर्वसामान्यांना न परवडणारे असे आहे. जामनेर तालुक्याच्या पेट्रोल पंपावर सर्वसामान्य महिलांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया याच्याविरुद्ध दिलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या जिवनावश्यक वस्तुच्या भाववाढीमुळे सामान्य जनतेचे आयुष्य/जिवन फारच बिकट/कठीण होत आहे हे यातून दिसत आहे.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गोष्टी यावर केंद्र सरकार ने जाणीवपुर्वक लक्ष देऊन वस्तूंचे भाव/दरवाढ राेखली पाहीजे. परंतु कुठेतरी बिझनेस मॅन ला मात्र फायदाच फायदा होताना दिसत आहे. कराेना ची लाट असून सुद्धा कुठेही बिझनेस मॅन चे कुठेही नुकसान झालेले नाही. परंतु सर्वसामान्य कुटुंबीयांचे मात्र नुकसान झालेले आहे.
कोरोना च्या लोक डाऊन च्या काळामध्ये कित्येकांचे व्यवसाय कितीकांचे घर उद्ध्वस्त झाले. परंतु केंद्र सरकारने त्या गोष्टीकडे लक्ष न देता. आपल्या पब्लिसिटी मध्येच लक्ष देण्यात आले. आज पेट्रोल पंपावर आधी पेट्रोल-डिझेलच्या बॅनर्स लागत होते. पंतप्रधानांचे आता मात्र त्यांचे मोफत लसीचे बॅनर लागतात. परंतु याच मोफत लसी साठी सुद्धा सर्वसामान्य लोकांना सहजा सहजी न मिळता दारोदार भटकावे लागले होते.
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने मुळे सर्वसामान्यांना दुसरेही गोष्टीं न परवडणाऱ्या आहेत. सर्वच गोष्टींवर याचा परिणाम होत असून सर्वच स्तरातून या गोष्टीचे दिवसेंदिवस वाढणारे भाव हे सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत. यावेळेस सुनिता पाटील, संगीता रोही मारी, रामदास शेळके, उत्तम काळे, सुंदर सिंग, सुदाम धनगर व इतर कार्यकर्ते डॉ.ऐश्वरी यश राठोड, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी, तालुका. जामनेर, जिल्हा. जळगाव यांच्या नेत्रुत्वाखाली ऊपस्थीत होते.