विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई दि (प्रतिनिधी) मराठवाड्याचे सुपुत्र, कवी, लेखक, पत्रकार, सामाजिक आंबेडकरी कार्यकर्ते, आर.आई.आई ऍक्टिव्हिस्ट डॉ. राजन लता ईश्वर माकणीकर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकी च्या रिंगणात उतरले असून व्यक्तिशः माकणीकर यांचा जनसंपर्क मतदारसंघात दांडगा आहे.
मरणोत्तर नेत्रदान, देहदान व अवयव दानाचा माणसं उरी बाळगून सामाजिक कार्यात त्यांची भरीव कामगिरी आहे. 25 वेळेस विक्रमी रक्तदान करून् तात्काल रोग्याला जीवनदान दिले आहे.
प्रामुख्याने युवक युवतीना रोजगार व स्वयंरोजगार मिळावा याकरिता जॉब प्लेशमेंट च्या माध्यमातून हजारोना नोकर भरती तर शेकडोना कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
कोरोना काळात मोफत ऑक्सिजन, अन्नदान, भोजन दान, औषधी दान असे उपक्रम राबवून त्यांनीं समाजमनावर वेगळीच छाप पाडली आहे.
कोरोना काळाच्या सुरुवाती पासुन् म्हणजेच पहिल्या दिवसापासून त्यांनी आपल्या असंख्य मित्रांसह स्वयसेवक म्हणून कार्य केले. अश्यावेळी ते स्वतः कोरोनाने ग्रस्थ होऊन मृत्यूच्या दारेतून बाहेर आले. ते त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच!
गरीब रुग्णांचे मोफत उपचार करवून दिले असून खर्चिक शस्त्र क्रिया ते अगदी मोफत तर माफक सवलतीत करून दिली व देतात यामुळे बराचसा गरीब वर्ग डॉ. माकणीकर यांच्या समर्थणात असेल.
एस.आर.ये प्रकल्पात मुळझोपडी धारकांना सदनिका मिळत नसल्यामुळे त्यांनी विकासक व मंडळ अधिकाऱ्यांना उपोशन करुन जाब विचारला व 10 हजार करोड रुपयांचा घोटाळा उघड केला.
एमआयडीसी कार्यालयाच्या गलथान कारभाराला कंटाळून एमआयडीसी कार्यलयाला विकासाक कार्यालयाचा बोर्ड लावून अधिकाऱ्यांना जेरीस आणले.
देशाल चाललेली विषमता समाजात त्याबद्दल जागृतीसाठी त्यांनी सुटबूट वर “शूद्र वॉक” केला होता. संविधानाची पायमल्लि होऊ नये, सर्व सामान्यांर्यसंत संविधांनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी त्यांनी. देशव्यापी संविधान जनजागृती व साक्षरता अभियान राबवत आहेत.
त्यांच्या या अभियानाला यश म्हणजे मविआ सरकारच्या काळात संविधान उद्देशिका शालेय अभ्यासक्रमात घेऊन दररोज पठण करण्यात येत आहे.
एकंदरीत पाहता डॉ. माकणीकर यांचा दांडगा जनसंपर्क असून त्यांची उमेदवारी ही विरोधकांना डोकेदुखी नये शकते. बौद्ध, दलित, मुस्लिम, ख्रिक्चन मतदारांना ते आकर्षित करून स्वतःसाठी त्यांचे मतदान घेऊ शकतात.
भाजपाचे मुर्जी पटेल व ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा मतदारसंघात जोर असला तरी डॉ. माकणीकर यांना कमी लेखून चालणार नाही. एक लढवय्या संयमी दिलदार मायाळू आणी तेवढाच विद्रोही या गुणामुळे त्यांची जन-माणसात ओळख आहे.







