• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

फ्री वाय फाय म्हणजे काहीवेळा धोक्यात पाय – (फसवणुकीचा लेटेस्ट प्रकार)सायबर तज्ञ नामांकित वकील श्री चैतन्य भंडारी, धुळे यांचे मनोगत/सर्वमान्य जनतेसाठी सावधानतेचा ईशारा !!

माणगंगा by माणगंगा
October 10, 2022
in मुंबई
0
पुन्हा एक सायबर विळखा…त्याचा धोका वेळीच ओळखा !…..सायबर तज्ञ नामांकित वकील श्री चैतन्य भंडारी, धुळे यांचे मनोगत/सावधानतेचा ईशारा

फ्री वाय फाय म्हणजे काहीवेळा धोक्यात पाय – (फसवणुकीचा लेटेस्ट प्रकार)

सायबर तज्ञ नामांकित वकील श्री चैतन्य भंडारी, धुळे यांचे मनोगत/सर्वमान्य जनतेसाठी सावधानतेचा ईशारा !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पूर्वी फक्त अधिकृत अशा विमानतळावर अथवा सरकारी कार्यालयात फ्री वाय फाय सुविधा असायची, मात्र लोकांची गरज ओळखून व आपल्या सेवेशी / बिजिनेसशी लोकांनी कनेक्ट राहावे म्हणून आता अनेक ठिकाणी “फ्री वाय फाय” ची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

अगदी कॉफी शॉप पासून फूड कोर्ट, मॉल, मोठे रेस्टॉरंट खाजगी बस स्थानक (वोल्वो) इत्यादी ठिकाणी ठळकपणे हल्ली “फ्री वाय फाय” चे बोर्ड लागलेले दिसतात. आणि बहुसंख्य ठिकाणी तिथेच जवळ त्याचा पासवर्ड पण दिलेला असता.


फ्री वाय फाय सुविधा बहुतेक अशाच ठिकाणी पाहायला मिळते जिथे बऱ्यापैकी वेळ लोकांच्या हातात असतो. त्यामुळे ते निवांत असतात. आणि माणसे निवांत असली की थोडी निष्काळजी असतात असं मानसशास्त्र सांगत.

नेमका याचाच फायदा घेऊन आता हॅकर मंडळींनी या “फ्री वाय फाय” मध्ये प्रवेश केला आहे.

तर त्याबद्दल आज थोडक्यात सांगून त्याचे उपायही सांगतोय.

फसवणुकीची पद्धत :

तुम्ही अशा फ्री वाय फाय ठिकाणी बसून तिथला ऍक्सेस घेऊन तुमचे नेट सुरु करता. सर्फिंग / सर्चिंग / चॅटिंग सुरु करता. मात्र जिथून हा ऍक्सेस घेतला आहे त्या उपकरणात एक प्रकारची चिप ऑलरेडी बसवलेली असते. ज्याच्या मार्फत व्हायरस (हॅकिंग) ची लिंक तुमच्या मोबाईलमध्ये घुसवली जाते. आणि त्यातून मग तुमच्या मोबाईल मधील फोटो / डेटा / इतर बँकिंग डिटेल्स वगैरे हॅक केले जातात.

त्यांनतर मग फोटो मॉर्फ वगैरे करून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून लुटले जाते किंवा मग बँकिंग व इतर डेटा माध्यमातून फायनॅन्शियली लुटलं जाते. कारण तुमच्या फोनमध्ये त्या व्हायरस मधून जणू काही असं सेटिंग ऍटोमॅटिक होते की मग जणू तुमच्या फोनचा चक्क क्लोन (डुप्लिकेट) त्या हॅकर कडे तयार होऊ शकतो. (जे कॉम्पुटर वापरतात त्यांना कळेल…. टीम व्ह्यूवर किंवा एनी डेस्क हे अँप जसे काम करते अगदी तसेच हे फ्री वाय फाय मधील व्हायरस काम करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये काय काय करताय तेही सहजपणे त्या हॅकरला समजू शकते.

म्हणजे पहा किती धोकादायक स्थितीत तुमचा फोन (म्हणजेच तुम्ही स्वतः) अडकता. उदा. गुगल पे जरी करत असाल तर तुम्हाला वाटत की कुणाला न दिसेल अशा अँगल ने मी पिन / पासवर्ड टाकतोय. पण बाबांनो ते सगळं स्क्रीन शेयर मुळे त्या हॅकर ला बसल्याजागी दिसतेय. त्यामुळे तुमचा पिन / पासवर्ड त्याला कळतो. त्यापुढं कहर हा की, तुम्ही एखाद्याला पेमेंट केले की नंतर तुमच्या बँकेचा मेसेज येतो. आणि त्यात सगळं ट्रँजॅक्शन तुम्हाला सांगून शेवटी एक ओळ येते की आता अमुक इतका बॅलन्स तुमच्या खात्यात आहे. (हेही त्या हॅकर ला दिसत) आणि मग दोन पाच सेकंदात तुमचं अकाउंट पार साफ धुतलं जात ! आणि तुम्हाला प्रश्न पडतो… पैसे गेले कसे ?
कळलं ? आता यावर उपाय काय मग ?

धोक्यातून सावरायचा उपाय :

सोप्पं आहे. शक्यतो अशा फ्री वाय फाय च्या मोहात पडूच नका. त्यामुळे मग ना रहेगा बास न बजेगी बासुरी. तसेही आजकाल सर्वांच्या मोबाईल मध्ये स्वतःचा डेटा पॅक असतोच की. तो वापरा. फुकटचे वायफाय वापरून दोन पैसे वाचवल्याच्या आनंदात सगळंच धुतलं जाईल तुम्हाला…. हे विसरू नका. असं म्हणतात की विमानतळ वगैरे अधिकृत ठिकाणी सर्व सुरक्षित असत. मान्य आहे. पण लोकांचा काय भरोसा ? तिथंही कुणीतरी स्वार्थीपणाने चार पैसे जास्त मिळावेत म्हणून असं काही करणार नाही कशावरून ? एकदा कळलंय की ते विष आहे तर त्याची परीक्षा घ्यायला का जायचं न ?

तेव्हा तो मोह टाळा… सुरक्षित राहा !

डीडी क्लास : एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या जगात “मोफत” असं काहीही नसत. तुम्हाला ते फक्त भासवलं जात. पण इतर मार्गाने ते लोक त्यांचा फायदा करून घेत असतात. हे विसरू नका. त्यामुळे “फुकट ते पौष्टिक” हि आपली मानसिकता बदला. नाहीतर कधीतरी असे अडकाल मग रडत बसाल ! त्यापेक्षा “फ्री” चा मोह सोडणे कधीही चांगले न !

Views: 294
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
डोंगरगाव व वाघाडी बु. येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी.

डोंगरगाव व वाघाडी बु. येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)