आटपाडीतील खोडापात्राचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी 6 कोटीचा निधी मिळावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी
आटपाडी येथील ओढा पत्राचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मिळावा यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे
आटपाडी नगरपंचायतीची स्थापना 20/05/2022 रोजी झाली असून शहराची लोकसंख्या 23, 000 हजार इतकी आहे. आटपाडी शहरातून जाणाऱ्या ओढ्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. शहरातून विविध भागातून येणारे सांडपाणी ओढ्यात समाविष्ट होते तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडाराडा व इतर कचरा साठलेला आहे
या सर्व कारणामुळे नैसर्गिक ओढ्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे .तरी या नैसर्गिक ओढ्याचे संवर्धन व सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे .त्यामुळे शहरातील अस्वच्छता कमी होईल व सौंदर्यामध्ये भर पडेल
तसेच शहरातील नागरिकांना फिरण्यासाठी व पर्यटनासाठी एक चांगले ठिकाण तयार होईल तरी शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कामासाठी 6 कोटीचा निधी अपक अपेक्षित असून तो उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे






