विभूतवाडी ता.आटपाडी येथील श्री. हनुमान विकास सोसायटीच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन, सभासदानी उपस्थित राहण्याचे आव्हान
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता. आटपाडी येथील श्री हनुमान विकास सोसायटीची सर्वसाधारण सभा 28 /10 /2022 रोजी सकाळी 9:30 ला आयोजित केली आहे. तरी या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी उपस्थित राहावे असे आव्हान हनुमान विकास सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
सभेपुढील विषय पुढीलप्रमाणे -मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्त वाचून दाखवणे ,31/03/2022 रोजी अखेरचा आर्थिक पत्रकांना वाचून मंजुरी देण्याबाबत, सन 2022- 23 सालासाठी संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्याबाबत, सन 2021 -22 लेखापरीक्षण अहवाल वाचून मंजुरी देणे ,व सन 2021 22 च्या वैधानिक लेखापरीक्षांच्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. सन 2022 23 सालासाठी शासन पॅनेल वरील वैधानिक लेखापरीक्षण यांची नेमणुकीस मंजुरी देण्याबाबत ,थकबाकीदार कर्ज वसुली बाबत चर्चा करणे बाबत ,संस्था सचिव यांची पूर्ण नियुक्ती करणे बाबत,
अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करण्याबाबत असे सर्वसाधारण सभेतील विषय आहेत तरी सर्व सभासदांनी सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे