• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

‘लष्कर- ए- देवेंद्र’ आणि दिवाळी

माणगंगा by माणगंगा
November 2, 2022
in मुंबई
0
‘लष्कर- ए- देवेंद्र’ आणि दिवाळी

‘लष्कर- ए- देवेंद्र’ आणि दिवाळी

स्प्राऊट्स Exclusive

सध्या देवेंद्र फडणवीस ‘मेघदूत’ मध्ये राहतात. याच बंगल्यामध्ये मागील बुधवारी पत्रकारांसाठी दिवाळीच्या निमित्ताने गेटटुगेदर ठेवण्यात आले होते. खरंतर ‘गेटटुगेदर’, ‘स्नेहमिलन’ अशी ही फक्त गोंडस नावं असतात. प्रत्यक्षात या कार्यक्रमाला गिफ्ट घेण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे साहजिकच या कार्यक्रमासाठी अक्षरश: झुंबड उडते.

यावर्षीही अशीच झुंबड उडालेली होती. पॉलिटिकल बिट सांभाळणारे कथित ज्येष्ठ पत्रकार व काही संपादक हे या कार्यक्रमाला हजर होते. ‘लोकसत्ता’चे मुख्य संपादक गिरीश कुबेर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेथे भरपेट जेवण केले. त्यानंतर एखाद्या लाचार पत्रकारासारखे ते निमूट लाईनीत उभे राहिले. ५० हजार रुपयांचे रिलायन्सचे गिफ्ट व्हॉउचर्स त्यांनी घेतले. त्यांच्या जोडीला असे १५० हून अधिक पत्रकार यावेळी उपस्थित होते. सर्वांना ही ‘दिवाळी’ मिळाली. यावेळी गिरीशजी ‘कुबेर’ झाले व पत्रकारिता दरिद्री झाली.

फडणवीस हे त्यांच्या उपद्रवमूल्य क्षमतेमुळे प्रसिद्ध आहेत. मात्र मीडियात सवंग प्रसिद्धीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच बोलबाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सध्या थोडे साईडलाईनला पडल्यासारखे वाटतात. त्यामुळे पत्रकारांची नाराजी दूर व्हावी व गिफ्ट देण्यामध्ये आपलीही एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा काकणभर अधिक दानत आहे, हे दाखविण्यासाठी फडणवीस यांनीही अशी मोठ्या रकमेची व्हॉउचर्स वाटली आणि ऐन दिवाळीत एक नवा विकृत पायंडा जन्माला घातला.

फडणवीस यांच्याप्रमाणेच मग शिंदे यांनीही तात्काळ त्याच दिवशी संध्याकाळी सर्व संपादक मंडळींना ‘वर्षा’वर बोलावले. त्यावेळी ओल्गा टेलिस ( Olga Tellis ), सुचेता दलाल यांच्यासारखी असंख्य संपादक मंडळी उपस्थित होती. याठिकाणी काय ‘दिवाळी’ देण्यात आली, याची माहिती स्प्राऊट्सच्या टीमच्या हाती आलेली आहे. पण पुरावा नसल्यामुळे या गोष्टी उघड करता येत नाही.

ठाण्यात शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकारांना मोठी ‘दिवाळी ‘ दिली. साध्या पत्रकारांना डिजिटल घड्याळ तर ठाण्यातील संपादकांना याहूनही महागडी गिफ्ट्स दिली.

ठाण्यापेक्षा मंत्रालयातील पत्रकारांचा रुबाब अधिक आहे. त्यामुळे त्यांना शिंदे ‘साहेब’ हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक महागडी भेट देतील, असे वाटले होते. विशेषत: साहेब आयफोन देणार आहेत, अशी बातमीही पसरली. त्यामुळे ‘वर्षा’वर पुन्हा पत्रकार व संपादकांची झुंबड उडालेली होती.

‘स्नेहमिलना’चा हा कार्यक्रम होण्याअगोदर ‘स्प्राऊट्स’मध्ये यासंबंधी पोलखोल करणारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली. सोशल मीडियावरून ती प्रचंड व्हायरलही झाली. ऍड असीम सरोदेसारख्या असंख्य वकील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार करण्याची तयारीही दर्शवली. त्यामुळे आधीच ‘५० खोके’ने बदनाम झालेल्या शिंदे यांनी नामुष्की टळावी म्हणून ‘वर्षा’वर आलेल्या पत्रकारांना फक्त जेवायला घातले, ड्रायफ्रूटसचे पॅकेट्स वाटले व मोकळे केले.

उद्धव ठाकरे यांनी प्रथमच दिली ‘दिवाळी भेट’

‘दिवाळी’च्या कथित स्नेहमिलनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या आयुष्यात प्रथमच काही ज्येष्ठ पत्रकारांना ‘मातोश्री’वर बोलावले. यात कुमार केतकर, निखिल वागळे यांच्यासारखेच पत्रकार उपस्थित होते. या सर्व भंपक संपादकांची कारकीर्द शिवसेना, भाजप व संघ यांना शिव्या घालण्यात गेली. किंबहुना त्यांना शिव्या देऊनच हे मोठे झाले आहेत. ही सर्व पत्रकार मंडळी सध्या ‘आऊटडेटेड’ झालेली आहेत. यांना मागील ८ ते १० वर्षांपासून कोणताही साधा जॉबही मिळवता येत नाही. स्वतःचे साधे युट्युब चॅनेल काढण्याची धमकही या मंडळींमध्ये नाही. अशी मंडळी उद्धव यांच्याकडे ‘दिवाळी’साठी आलेली होती.

केतकर आजमितीला काँग्रेसचे खासदार आहेत. तेथेही ते मौनीबाबा म्हणून कुप्रसिद्ध आहेत. या सर्व ज्येष्ठ व बेरोजगार पत्रकारांना ठाकरे यांनी भलेमोठे ‘गिफ्ट’ दिले, अशी खात्रीलायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेली आहे, मात्र ठोस पुरावा नसल्यामुळे याविषयी ‘स्प्राऊट्स’च्या वाचकांना माहिती देता येत नाही.

पराग शहा आणि HMV
भाजपचे मुंबईतील आमदार पराग शाह यांनी मंगळवारी ट्विट केले. त्यात त्यांनी पत्रकारांचा उल्लेख HMV ( his masters voice ) म्हणजेच कुत्रा असा केला. यावर त्यांना सर्वांनीच ट्रोल केले. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःच ‘शेपूट’ घातले व ते ट्विट डिलीट केले. मात्र या ट्विटचा कुठल्याही पत्रकार संघटनेने जाब विचारला नाही, की निषेध दर्शवला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Views: 236
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
माण तालुका फोटोग्राफर असोसिएशन तालुकाध्यक्षपदी प्रफुल कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवप्रसाद कुलकर्णी,सचिव धनंजय कावडे

माण तालुका फोटोग्राफर असोसिएशन तालुकाध्यक्षपदी प्रफुल कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवप्रसाद कुलकर्णी,सचिव धनंजय कावडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)