करगणी ते बनपुरी रस्ता कामाची मनसे ची चौकशीची मागणी
करागणी ते बनपुरी रस्त्याचे काम न करताच बिले काढली असून त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनसेने केली आहे
आटपाडी येथील सहाय्यक अभियंता श्रेणी 1सार्वजनिक बांधकाम विभाग यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक तालुका अध्यक्ष मारुती खिलारी (दाजी) यांच्या वतीने चिंच घाट ते बनपुरी प्रजिमा 51 चे झालेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याची माहिती मागितली असून तसेच .करगणीपासुन ते बनपुरी च्या दिषेस किमान दोन ते अडीच किलोमीटर काम न करता कॉन्ट्रॅक्टरने काम पूर्ण कसे केले व त्या कॉन्ट्रॅक्टर चे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाने कसे काय पास केले याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा यासाठी मनसेच्या वतीने जाब विचारण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .