दहिवडी शहर मराठी पत्रकार संघेटनेच्या अध्यक्ष पदी दैनिक पुढारी चे माण तालुका प्रतिनिधी राजेश इनामदार यांची तर कार्याध्यक्ष पदी माणदेश भूषण चे संपादक अजित कुंभार यांची निवड
दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे
दहिवडी येथे झालेल्या बैठकीत दहिवडी पत्रकार संघटनेच्या निवडी पार पडल्या. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे व राज्याच्या अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना काम करणार असून पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.त्याच बरोबर जनतेच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना काम करणार आहे.
संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून विशाल गुंजवटे यांची,संघटनेच्या उपाध्यक्ष पदी जयराम शिंदे,सचिव पदी चैतन्य काशीद, यांची तर खजिनदार म्हणून दिलीपराव माळवदे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून विजय ढालपे, योगेश गायकवाड, नितीन पुकळे,निशांत बोराटे,आत्माराम शिंगाडे यांची निवड करण्यात आली.
सर्व पदाधिकाऱ्यांचे ना.जयकुमार गोरे राज्याचे अध्यक्ष हरीश पाटणे सर व माण तालुक्यातील राजकीय,शासकीय,सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेटून, फोनवर,सोशल मीडियावर शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.