जैन समाजातर्फे अॅड. चैतन्य भंडारी यांना पुरस्कार
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे – धुळे येथील अरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट व श्री महावीर जैन महिला सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान तर्फे अॅड. चैतन्य भंडारी यांनी देशभरात केलेल्या सायबर जनजागृतीच्या कार्याबाबात यांचा नुकताच सकल जैन समाजातर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात जिल्हाधिकारी जितेंद्रजी पापळकर साहेब, आमदार साहेब श्री. अनुपजी अग्रवाल, जैन सकल समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक व अरिहंत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नंदलालजी रुणवाल, दिलीपजी बाफना, दिलीपजी पारख, नितीनजी खिंवसरा, मनोजजी लोढा व इतर अरिहंत चॅरिटेबल ट्रस्टचे इतर सदस्य व श्री महावीर जैन महिला सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानचे सन्माननीय महिला पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्रजी पापळकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करुन अॅड. भंडारी यांच्या सायबर क्षेत्रातील कामगिरीबद्दल कौतुक करुन त्यांना भविष्यातील वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी जैन समाजातर्फे इतर मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जैन समाजाचे सामान्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.