सत्यशोधक क्रांति दल तर्फे तऱ्हाडी येथे जिजाऊ जयंती साजरी
प्रतिनिधी = सत्यशोधक क्रांति दल ह्या सामाजिक संघटना मार्फत तऱ्हाडी येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन शिवश्री दिलीप पाटील यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत तऱ्हाडी, प्रमुख पाहुणे श्री दिनकर पवार संपादक प्रेस पथक, श्री पंडितराव निकम संपादक महिला दर्पण, प्रा. गावित कला महाविद्यालय बामखेडा, गणेश मंडलिक माध्यमिक शिक्षक जलोद, विजय पाटील संचालक वि. का. सो. विखरण सामाजिक कार्यकर्ते संतोष जाव्हेरी, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपसो. भिका सेना अहिरे माजी संचालक वि. का. सो. तऱ्हाडी यांनी स्वीकारले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कमलेश अहिरे यांनी केले. कचरू अहिरे निमंत्रक सत्यशोधक क्रांती दल यांनी परिश्रम घेतले