अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने घेतली कोकरे कुटुंबीयांची मुले दत्तक-_–
श्री तुकाराम कोकरे राहणार दिघे वस्ती ता. वेल्हा राजगड जिल्हा पुणे येथील रहिवासी असून ते सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते होते परंतु सामाजिक कामासाठी गेले असता त्यांच्या डोक्यात दुखायला लागले व काही काळानंतर त्यांच्या डोक्यामध्ये रक्तस्राव झाला बेशुद्ध झाले त्यामुळे त्यांचे ऑपरेशन केले ऑपरेशनचा खर्च खुप होता साडेतीन ते साडेचार लाख रुपये असा खर्च होता ऑपरेशन झाले परंतु डॉक्टरांनी त्यांना किमान चार ते पाच वर्ष कोणतेही काम धंदा प्रवास करायचा नाही असं सांगितल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले त्यांना दोन मुले असून ते शिक्षण घेत आहेत
दवाखान्याचा खर्च व शैक्षणिक खर्च भागवणे मुश्किल झाले. गेले दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांचे बंधू यांचे निधन झाले असून त्यांनाही दोन्ही मुले आहेत त्यांच्याही कुटुंबाची बऱ्यापैकी जबाबदारी हे उचलत होते परंतु त्यांच्या ऑपरेशन मुळे दोन्ही कुटुंबाचा खर्च भागवणे अवघड झाले असल्यामुळे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने श्री तुकाराम कोकरे यांची दोन्ही मुले व कै नवनाथ यांची दोन्ही मुले दत्तक घेऊन त्यांना दिनांक ५-१-२०२५ रोजी पुणे येथे १०००० रुपयाचा चेक दिला व वह्या देऊन ४ ही मुलांची शिक्षणाची जबाबदारी अहिल्यादेवी ट्रस्टने घेतली असून जोपर्यंत श्री तुकाराम कोकरे फिट व्यवस्थित होत नाहीत.
तोपर्यंत त्यांच्या कोकरे कुटुंबीयांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी अहिल्यादेवी ट्रस्ट घेईल अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रवीण काकडे यांनी दिली श्री तुकाराम कोकरे हे संघटनेसाठी व समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱा कार्यकर्ता कोणाचेही कसलीही काम असले की लगेच हजर असणारा हा कार्यकर्ता सगळ्यांच्या मदतीला धाऊन जाऊन कार्यकर्ता डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना समाज बांधवांना मदतीचा हात देणारा परंतु त्यांच्या या कुटुंबावर अशी वेळ आल्यामुळे समाजासाठी व संघटनेसाठी प्रामाणिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आम्ही घेत असतो तीच आमची खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हणा किंवा सामाजिक जबाबदारी म्हणा म्हणून आम्ही हे पाऊल उचलत आहोत असे कोणत्याही कार्यकर्त्यांच्या कुटुंबावर संकट आले तर निश्चितच अहिल्यादेवी ट्रस्ट फुलना फुलाची पाकळी मदत देऊन त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम करते म्हणूनच अतिशय दुर्गम भागामध्ये असणाऱ्या कुठल्याही सुविधा नसणाऱ्या गावातील या कुटुंबालाआपल्या पोटाची खळगीभरण्यासाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे या ठिकाणी मिळेल ते काम धंदा करण्यासाठी आलेले आहे
परंतु नियतीने त्यांच्यावर अशा प्रकारे संकट ओढवल्यामुळे त्यांना आम्ही मानसिक दृष्ट्या भक्कम आधार देण्याचं काम केलेलं आहे प्रा सौ शितल काकडे व सौ सुरेखा कोकरे व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते