“वीर वीरांगना महाराष्ट्र २०२५” स्पर्धेत महाराष्ट्राच्या शौर्यगाथांचा आणि संस्कृतीचा उत्सव!
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेचा गौरव आणि राजमाता जिजाऊंच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली “वीर वीरांगना महाराष्ट्र २०२५” ही भव्य सौंदर्य स्पर्धा आणि राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार २०२५ हा १२ जानेवारी २०२५ रोजी हॉटेल ग्रँड मेहफिल येथे जल्लोषात पार पडला. डिवाईन आणि त्रैलोक्य इव्हेंट्स यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेला निवेदा बिझनेस एआय सोल्युशन्स प्रा. ली. यांनी पॉवर्ड बाय पार्टनर म्हणून सहकार्य दिले.
सांस्कृतिक चळवळीचा सन्मान करतांना आयोजक राधा ढेकेकर, सुराज कुटे, आणि नम्रता गायकवाड यांनी सांगितले की, “ही स्पर्धा फक्त सौंदर्याच्या व्याख्या बदलणारी नाही, तर महिलांच्या आत्मसन्मानाला आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देणारी सांस्कृतिक चळवळ आहे.”
इतिहासाशी नाते जोडणारा मंच उपलब्ध करून ही स्पर्धा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला साजरे करणारी ठरली. स्पर्धकांनी पारंपरिक पोशाख, कला, आणि आत्मविश्वासाने सजलेल्या मंचावर आपले कौशल्य सादर करताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपदेचा वारसा पुढे नेला.
विजेत्यांचा सन्मान :
मिस कॅटेगरीत सलोनी तिवसकर विजेती ठरली, तर अमिषा पोटे आणि अंजली म्हाला यांनी अनुक्रमे पहिली आणि दुसरी उपविजेती पदं मिळवली. मिसेस कॅटेगरीमध्ये संजीवनी काकडे विजेती ठरली, तर शामली देशमुख आणि चैताली चर्जन अनुक्रमे उपविजेत्या ठरल्या. किड्स कॅटेगरीत आराध्या ठाकरेने विजेतेपद पटकावले, तर उन्नती आढाऊ आणि रेयांश सुने उपविजेते ठरले.
आकर्षक सादरीकरण आणि जबरदस्त सहभाग घेत अक्षय गावंडे यांनी उत्कृष्ट संचालन केलेल्या या कार्यक्रमात प्रियांका गणोरकर, शीतल बावणे, आणि आशिष तरार हे जुरी म्हणून लाभले. तर केतन अरमारकर आणि रेहान अन्सारी यांनी कोरिओग्राफीद्वारे या स्पर्धेला वेगळी उंची दिली.
तलवार-लाठीकाठीचे खेळ आणि परफॉर्मन्सने रंगलेली रात्र न्यारी होती. यासाठी सेन्सई उमेश मोहले यांची टीम यांनी अथक परिश्रम घेतले. थोरवी टारपे, लक्ष्मी टारपे, मेघा बनकर, सुमित जावकर, जान्हवी काळे, माहिरा अडवानी, प्रीती काळे आणि मल्हार यांनी त्यांच्या थरारक परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तलवारबाजी, लाठीकाठी, आणि चक्रीसारख्या शौर्यकृतींच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या वीरतेची झलक अनुभवायला मिळाली.
संस्कार शॉपिंग मॉलने मॉडेल्स आणि आयोजकांसाठी विशेष डिझायनर पोशाख आणि आरती नाट्य शृंगार व रामलीला यांचे खास पोशाख समाविष्ट आहेत. याशिवाय, जिंकल, मेकल रेंटल्स मार्फत नववारी साड्याही उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तर सोनरूपम आणि सोना कलेक्शनकडून दागिन्यांची विशेष सोय करण्यात आली आहे.
इव्हेंटच्या ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कर्तृत्वान आरती त्रिवेदी यांची निवड करण्यात आली होती.
या इव्हेंटसाठी प्रमुख मेकअप आर्टिस्ट म्हणून अनुजा डहाके (रूपदा मेकओव्हर), मयुरी मेकओव्हर, अमृता ताजने, आर्या मेकओव्हर, आणि साक्षी गणोरकर यांचा समावेश होता.
या इव्हेंटचे शो-स्टॉपर्स अनाया सावलानी, शिव सिंग राठोड, आणि तोषी खोटंगले होत्या.
सदाशांती फाउंडेशनमधील अनाथ मुलींना या इव्हेंटमध्ये आपली कला सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला. शौर्यकृतींच्या परफॉर्मन्सने उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली.
या इव्हेंटसाठी इनफ्लुएन्सर्स अवॉर्ड्स मध्ये स्वाती गाडे, वैभवी माकोडे, तन्वी काकड, तृप्ती खंडारे, विपीन माहोरे, चेतन ढोके, ईशान देवरे, विजय खंडारे, प्रथमेश टारपे, रजत वानखडे, आणि सार्थक मुंडवाईक यांचा समावेश होता.
इव्हेंटला यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी इव्हेंट कोर्डीनेटर विक्रम येवतिकर लाभले व सपोर्ट टीम मध्ये शीतल वलके, प्रसाद जेवडे, शुभांगी कावडे, स्नेहल सुने, माधुरी धर्माळे, मंजुषा तांडेकर, मोनिका बढनखे, रमेश बोरकुटे, किरण पंजवानी, भारत चौधरी, निशी चौबे, प्रीती काळे, सोहन टारपे, ऋषी सिंग राजपूत, भारती दातेराव, ज्योती पाटील, शीतल चौधरी, अतुल चव्हाण, सई जाधव, वरुण मालू, संजय उमक, पुष्पराज कुटे, यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
फोटोग्राफर पार्टनर विवेक पवार यांचं पवार स्टुडिओ होता. सोबतचं प्रणव अढाऊ, अंकित पिंपळकर, प्रज्वल सातपुते, आकाश तिखीले, प्रतीक राजगुरे आणि राम दहात्रे देखील फोटोग्राफी टीममध्ये होते.
प्रायोजकांची मोलाची साथ लाभली जिजाऊ बँक, बिर्ला ओपन माईंड्स स्कूल, कॅफे प्राईम टाइम, मरिज्ञा बिर्याणी, विंग्स मेकओव्हर, गायत्री नर्सरी, शिवकन्या ज्वेलरी, रघुवीर मिठाई, वर्टेक्स हीलिंग सेंटर, खोडीयल रेंटल, आणि इतर अनेक प्रायोजकांनी या कार्यक्रमाला भक्कम आधार दिला.
कार्यक्रमाची शोभा क्षिप्रा मानकर, अविनाश कोठाळे, पंकजा इंगळे, कुमुदिनी इंगळे यांचा मुळे वाढली.
“वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” या स्पर्धेने महिला सक्षमीकरणाला नवा आयाम दिला असून, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक शौर्याला नवीन रूपात सादर केले. प्रेक्षक आणि सहभागींच्या उत्साहाने ही सांस्कृतिक चळवळ यशस्वी ठरली!