भोरखेडा पटेल विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन कार्यक्रम
त-हाडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे विद्यालयाचे प्राचार्य आर एफ शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रथम प्रमूख पाहुणे पर्यवेक्षक सी जी पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात केली त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायदेविषयक कार्याची माहिती सविस्तर करून दिली न्याय हा सर्व भारतीयांसाठी समान आहे याचे महत्त्व पटवून दिले.
असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन एस एस एकक चे कार्यक्रम अधिकारी एन वाय बोरसे तर सूत्रसंचालन व आभार के एस कोळी यांनी मानले यावेळी एस एस निकुभे,एन डी चव्हाण, डी आर राजपूत, आर जी पाटील, एस जे पाटील, एस एन पाटील,एस एम पाटील, एस आर देसले, पी टी चौधरी, व्ही एस येशी, व्ही डी पाटील, संजय चौधरी व्ही बी शर्मा, मिना पटेल, दिपाली निकम,काजल राजपूत, जे डी पाटील, तुषार पाटील,चंदन पावरा,शाम जाधव सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते







