लाकडी अवजारे होताहेत शेतीतुन हद्दपार
“लोखंडी आवजारांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल”
त-हाडी,
अलिकडच्या काही वर्षात शेतीसाठी अत्यावश्यक लागणारे विविध प्रकारचे तंञण्यान वेगाने विकसित होत असुन,जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा प्रत्यय येत आहे शेती आणी शेतकरीही याला अपवाद नाहीत.ट्रॅक्टरपाठोपाठ विविध लोखंडी अवजारे बाजारात आल्यामुळे शेती उपयोगी सर्वच लाकडी अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी जवळपास सर्वच शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी करण्यासाठी बैल नागंरनीला बाजु ठेऊन ट्रक्टरच्या सहाय्याने नांगरणी,मोगडनी रोटा वेटा आदि कामे ट्रॅक्टरच्या साह्याने उरकून घेतली
अलीकडच्या काही वर्षापासून लाकडी,वखर,तिफन,कोळपे,लायखी,बैलगाडी,लाकडी जु आदी शेतीउपयोगी सर्वच लाकडी अवजारे काळ्या मातीतुन काढता पाय घेऊ लागली आहेत नवनव्या तंञन्यानामुळे पारंपरिक पद्धतीने होणारी शेती आता मागे पडत चालली आहे.शेतीकामासाठी लागणारी सगळीच लाकडी अवजारे आता दिसेनासी होऊ लागली आहेत.
लाकडी अवजारांची वाढती कींमत मजुरी व दुरूस्थीचा खर्च अवाक्याबाहेर जात आहे शिवाय या अवजारांकडे दुर्लक्ष झाले तर मातीच्या संर्पकामुळे त्यांना उधई लागते त्यामुळे तुलनेने वापरायला सोईच्या असणार्या लोखंडी अवजारांनी शेतीमध्ये चांगलाच जम बसविल्याचे चिञ सद्या त-हाडी परीसरात पहायला मिळत आहे.नवनविन तंञन्यानामुळे कपाशी कांदा मक्का भुईमुंग अशी जादा उत्पन्न देणारी नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा हल्ली कल वाढला आहेत काळ्या मातीत राबणारी लाकडी तिफन आता नजरेआड होऊ लागली आहे.
बैलजोड्यांचा किमती शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर पोचल्याने बैलजोडी खरेदी करावी कि,नाही याचा विचार शेतकऱ्यांना चारदा विचार करावा लागतो याशिवाय शेतात मजुर मिळत नसल्याने शेतीच्या मशागती साठी हल्ली ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे शेतीच्या मदतीला आधुनिक यंञे आल्यामुळे वेळेची बचत होत आहेत मुळातच महागडी बि बियाने औषधे रासायनिक खते व मजुरांची दिवसेंदिवस भासणारी कमतरता यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे जिकरीचे होऊन बसले आहेत.
त्यातच लाकडी तिफनीचे काय पण सगळीच लाकडी अवजारे शेतीमधुन काढता पाय घेत आहेत पारंपारिक पध्दतीने होणारी शेती आता आता व्यापारी पध्दतीनेच होणार आहे.त्यामुळे शेतीचे होणारे फायदे तोटे आपल्याला स्विकारावेच लागणार आहेत अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहे.
शेतकरी कोट : (प्रगतीशील शेतकरी, अभानपुर ) लाकडी अवजारांची वाढती कींमत मजुरी व दुरूस्थीचा खर्च पाहता हा खर्च शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर जात आहे शिवाय या अवजारांकडे दुर्लक्ष झाले तर मातीच्या संर्पकामुळे त्यांना उधई लागते त्यामुळे तुलनेने वापरायला सोईच्या असणार्या लोखंडी अवजारे शेतीमध्ये वापरणे हल्ली कल शेतकऱ्यांचा वाढला आहे.शिवाय हवे तेव्हा शेती उपयोगी लोखंडी अवजारे बाजारात उपलब्ध असल्याने लोखंडी अवजारे वापराकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
त-हाडी: शिरपूर तालुक्यातील वरुळ येथील शेती उपयोगी उपयोगी बनवलेले लोखंडी अवजारे







