त-हाडी येथे ‘पंचप्रण शपथ’ चे सामुहिक वाचन
*त-हाडी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी ‘माझी माती, माझा देश ’ उपक्रमाअंतर्गत शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील स्व. आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रांगणात ‘पंचप्रण शपथ’ चे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे, जय मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धनगर . शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष तुळशीराम भामरे तापी विद्या प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष सुभाष भामरे, माजी सरपंच सुदाम भलकार मुख्याध्यापक एन एच कश्यप प्राचार्य नितीन पाटील उपस्थित होते सकाळी प्रभातफेरी , जागतिक आदिवासी दिनानिमित्त, बिरसा मुंडा, एकलव्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले व त-हाडी गावातील माजी स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ गोसावी, प्रकाश डामरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व शाळेच्या प्रांगणात पंच्याहत्तर वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच मुख्याध्यापक अशोक बडगुजर यांनी सर्व विद्यार्थ्यांनी व उपस्थित नागरिक व शिक्षकांनी पंचप्राण शपथ दिली. यावेळी ग्रामविकास अधिकारी देवीदास धांडे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, किरण भलकार ,मंगलबाई भिल . पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश पाकळे उपाध्यक्ष सतीश सोनवणे, विशाल कंरके,, विलास भामरे, किरण अहिरे, नरेंद्र सोनवणे भावनेश पाटील,अंगणवाडी सेविका, महिला बचत गट कार्यकर्ती पुनम बांशिंगे व शिक्षक शिक्षिका व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन रावसाहेब चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अशोक बडगुजर यांनी मानले







