बीएसएनएल तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत आदर्श मराठी विद्यामंदिराचे सुयश.
त-हाडी बीएसएनएल फाउंडेशन दिवस निमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत नंदुरबार येथील स्वा सै गो देसाई आदर्श मराठी विद्या मंदिरातील एकूण २६१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ‘शालेय शिक्षणात इंटरनेटचा वापर ‘ या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेत इयत्ता चौथीतील श्वेता शामसुंदर सामुद्रे या विद्यार्थिनीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. या निवडीबद्दल सार्वजनिक शिक्षण समितीचे संस्थेचे चेअरमन अॅ रमणभाई शाह ,संस्थेचे सचिव डॉ योगेशभाई देसाई, मुख्याध्यापिका मिनाक्षी भदाणे व सर्व शालेय परिवारातर्फे तिचे कौतुक करण्यात आले. स्पर्धा प्रमुख नितेश नाथजोगी व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.







