घरकुल कंत्राटी कर्मचा-यांचे
आजपासून बेमुदत काम बंद !
वरुळ : ग्रामीण गृहनिर्माण योजना शासनाची अत्यंत महत्वाची व लक्षवेधी योजना असून रात्र अन दिवस झटून वेळेत काम पूर्ण करनाऱ्या राज्यस्तरीय, विभागस्तरीय,जिल्हास्तरीय प्रोग्रामर व जिल्हा व तालुकास्तरिय ऑपरेटर तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधनात वाढ करावी, याकरिता धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांना महाराष्ट्र राज्य घरकुल संगणक परीचालक संघटनेचे (ग्रामीण) प्रोग्रामर हर्षल माळी यांच्यासह खगेश दंडगव्हाळ, विकास पाटील, प्रवीण निकुंभे, तुषार लोहार, दीपक ठाकरे, दिनेश पाटील यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
तसेच मानधन वाढ होईपर्यंत व मागण्या मान्य होईपर्यंत दि. २८ नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे घरकुल योजनांच्या कामांची गती निश्चितच मंदावणार आहे.
दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या देण्यात आलेल्या आहेत. १. सर्व कर्मचारी यांचा अनुभव व वय बघता जॉब security बाबत विचार व्हावा व वयाच्या 58 वर्ष पर्यंत नोकरीची हमी मिळावी. २.ग्रामविकास विभागा अंतर्गत येणा-या उमेद, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन व इतर सर्व विभागामध्ये ज्याप्रमाणे HR Policy लागू केलेल्या आहे. त्यासर्व आम्हाला तात्काळ लागू करुन मिळाव्यात.ᝄ३. ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळमानधनामध्ये एकूण 30% मानधन वाढ करावी.
४. सर्व जिल्ह्यांना प्रत्येक महिन्यातील ५ तारखेच्या आतच CSC कडून पगार व्हावे. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. ५.CSC e-Governance संस्थेमार्फत प्राप्त होणारे मासिक मानधन तपशील पाहता एकुणमुळ मानधनातून Gratuity, ESIC, PT इ. यांची मासिक रक्कम कपात केली जाते. सर्व कर्मचारीयांच्या मासिक मुळ मानधनातून PF (Employee Shares), Gratuity, ESIC इ. कपात न करता ती नियमानुसार संबंधित संस्थेने अदा करावी.६. घरकुल योजनेत काम करत असणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्यस्तरावरुन घेण्यात येणा-या सर्व शासकीय भरती प्रक्रियेमध्ये आरक्षित राखीव जागा उपलब्ध करुन द्याव्यात.७. केंद्रपुरस्कृत योजनाप्रमाणे राज्यपुरस्कृत योजनेचे देखील मानधन मिळावे असे निवेदन देण्यात आले.
फोटो-धुळे जिल्ह्यातील घरकुल कंत्राटी कर्मचारी आज पासुन बेमुदत कामबंद आंदोलन केले असुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनानिवेदन देतांना महाराष्ट्र राज्य घरकुल संगणक परीचालक संघटनेचे (ग्रामीण) जिल्हा प्रोग्रामर हर्षल माळी यांच्यासह खगेश दंडगव्हाळ, विकास पाटील, प्रवीण निकुंभे, तुषार लोहार, दीपक ठाकरे, दिनेश पाटील