कोंढावळ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ‘यांची पुण्यतिथी साजरा.
कोंढावळ – संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक जे. पी. माळी होते तसेच संस्कृतिक समिती अध्यक्ष जी. डी. वाल्हे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली.तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयीं निबंध स्पर्धा घेण्यात आली.
उपशिक्षक पी. टी. परदेशीं यांनी आभार व्यक्त केले.तसेच शाळेतील उपशिक्षक डी. एस. जगताप, आर. एच. खैरनार, पी. टी. परदेशीं, वाय. एस. शिंपी, के. एस. सैंदाणे, एस. पी. सोनवणे, एम. एम. माळी. व शिक्षेकेत्तर कर्मचारी आर. डी. माळी, आर. एम. बागुल, एस. डी. बैसाणे यांनी सहकार्य केले
आभार प्रदर्शन पी. परदेशी यांनी केले