एच आर पटेल कन्या विद्यालय वरुळ येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त किशोरी मेळावा संपन्न
त-हाडी
एच आर पटेल कन्या विद्यालय वरुळ येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी वरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर डॉ.दिपिका मोरे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .प्राचार्य एस. एन. जोशी यांनी डॉक्टर मोरे यांचे स्वागत केले.
डॉ.दिपिका मोरे यांनी किशोरी मेळाव्यानिमित्त इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यिनींना किशोरवयीन मुलींच्या शारीरिक, मानसिक व भावनिक समस्या .संतुलित आहार व मासिक पाळी व्यवस्थापन व घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले
तसेच विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एस.एन. जोशी ज्येष्ठ शिक्षिका एम.बी. पाटील, पी .आर. मोरे ,एस .एस. पाटील ,प्रा.एम. व्ही.पाटील प्रा.डी. एन .माळी ,बी एन पाटील ,आर एम मोरे ,डी. टी. चित्ते ,एन. एस.म्हस्के ,एस. एम. झटकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. सी. शिंपी यांनी तर आभार प्रदर्शन एम. व्ही. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.







