भोरखेडा पटेल विद्यालयात बालिका दिनानिमित्त महिला पोलीस व शिक्षिका यांचा सन्मान..
“मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी सुरक्षा पथक सदैव तत्पर”- छाया पाटील (पोलीस उपनिरीक्षक)
आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा ता शिरपूर जि धुळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने बालिका दिन हा महिला पोलीस व शिक्षिका यांचा सन्मान सोहळा व महिला सुरक्षा व सायबर क्राईम या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक सी जी पाटील तर प्रमुख वक्ते शिरपूर पोलीस स्टेशन चे दामिनी सुरक्षा पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक छाया बी पाटील होते तर पोलीस महिला पौर्णिमा पाटील, रोशनी पाटील नुतन बाविस्कर, अनुराधा धाकड, तसेच महिला शिक्षिका मिना पटेल, रूपाली तिरमले, ऐश्वर्या मोरणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्या सर्व महिलांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर भिल उपस्थित होते.पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील यांनी मुलींच्या सुरक्षा व 18 वर्षातील विद्यार्थ्यांना सुरक्षा कायद्याच्या कक्षेत कोणत्या प्रकारची सुरक्षा पुरविली जाते याविषयी दामिनी सुरक्षा पथक सदैव तत्पर आहे यासाठी टोल फ्री नंबर 112 वर आपण तक्रार दाखल करू शकतात त्यामुळे आपल्याला तात्काळ मदत प्राप्त होते.तसेच सायबर क्राईम विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन चा वापर कसा करावा कोणती काळजी घ्यावी यासाठी पालकांना माहिती द्यावी अशी सूचना दिली,सुरक्षित रहा काळजी घ्या असे आवाहन केले.रुपाली तिरमले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात आजच्या काळात शिक्षणाचे वाढते महत्व व मुलींचे स्थान याविषयी विचार व्यक्त केले.विद्यार्थिनींनी प्रतिनिधी गायत्री कोळी हिने मी सावित्रीबाई फुले बोलतेय ही एकांकिका सादर केली.प्रास्ताविक व सूत्रसंचालन एन वाय बोरसे यांनी तर आभार एस आर देसले यांनी केले यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते






