अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ बीड नाथपंथी समाजाची जनगणना करण्याचे काम सुरू समाज बांधवांनी सहकार्य करावे कार्याध्यक्ष–
संजय सावंत
बीड पाटोदा ;
-बीड जिल्ह्यातील नाथपंथी समाज बांधवांची जनगणनेचे काम मोठ्या उत्साहाने सुरू आहे हे काम जिल्हाध्यक्ष केदारनाथ चव्हाण, संजय सावंत हरिभाऊ भराडी, रंगनाथ पैठणकर, गणेश शिंदे आणि प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षांनी मोठ्या जोमाने सुरू केले आहे.तरी जिल्ह्यातील प्रत्येक गाव,वाड्या तालुका येथील नाथपंथी समाजातील नाथ बांधवांची अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर आपले व आपल्या गावातील नाथपंथी समाजाची नावे पाठवावीत.जनगणना करण्याचे कारणे अशी आहेत की, प्रत्येक ठिकाणी समाज दुर्लक्षित असून समाजचे प्रश्न सोडविण्यासाठी एकी पाहिजे तसेच काही ठिकाणी एखाद्या समाज बांधवांची मयत झाली तर दफन करण्यासाठी स्मशानभूमीची नाही एखाद्या ठिकाणी गावात एकच घर असते तेथे काही ठिकाणी अन्याय होतो.आपली एकजुट असेल तर न्याय मागण्यासाठी आवश्यक म्हणून मी संजय सावंत अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ कार्याध्यक्ष नात्याने नाथपंथी समाज बांधवांना विनंती करतो की कृपया महासंघ बीड यांच्या कडे व्हाट्सएप नंबर 9420033360,9075786002,9518385842 नावाची यादी करून पाठवावी ही विनंती .







