• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

उत्पादकांना अच्छे दिन ; केळीच्या संरक्षणासाठी प्रत्येक घडाला प्लॅस्टिक आच्छादन

माणगंगा by माणगंगा
January 9, 2024
in महाराष्ट्र
0
उत्पादकांना अच्छे दिन ; केळीच्या संरक्षणासाठी प्रत्येक घडाला प्लॅस्टिक आच्छादन

उत्पादकांना अच्छे दिन ; केळीच्या संरक्षणासाठी प्रत्येक घडाला प्लॅस्टिक आच्छादन

त-हाडी, ता.९ :(प्रतिनिधी) एकेकाळी दुष्काळी स्थितीमुळे इतिहासजमा झालेले केळीचे पिक अलिकडे पुन्हा लागवडीखा ली येऊन ते जोमदार बहरल्याचे,अन् त्यास चांगला भाव मिळत असल्याने केळी उत्पादकांना अच्छे दिन आल्याचे चित्र पाहवयास मिळत असून केळी पिकण्यापूर्वीच फळांवर माशी व डासांचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी केळी उत्पादकांना जिवाचा आटापिटा करावा असल्याचे चित्र वरुळ – त-हाडी (ता.शिरपुर) परिसरात पाहवयास मिळते.

चार वर्षापूर्वी पाणीटंचाईच्या गर्तेत सापडल्याने केळीचे पिक परिसरातून इतिहासजमा होऊन दृष्टीआड झाले होते. मात्र मागील तीन वर्षे अतिवृष्टी होऊन परिसरात पाणीपातळी वाढून फळबागा, रब्बी व खरिपाचे पिक वाया गेली. काही चाणाक्ष शेतकऱ्यांनी केळीची नव्या उमेदी ने लागवड केली व दृष्टीआड गेलेले केळी च्या बागा त-हाडी वरुळ भटाणे अभानपुर विखरण जवखेडा भामपुर , परिसरात काही मोजक्याच शेतकऱ्याकडे लागवडीखाली आहेत.

गतवर्षी केळीला अपेक्षीत भाव मिळाले नसले तरी यंदा मात्र परिसरातील केळीने जळगाव जिल्ह्याची मक्तेदारी मोडीत काढली असून केळीचे पिक जोमदार बहरून त्यांस चांगला दर मिळत आहे. मात्र केळी उत्पादकांच्या आनंदावर यावर्षी पाणीटंचाई विरजण टाकणारी ठरणार आहे. दर्जेदार केळी पाहून खरेदी साठी व्यापारी शेतकऱ्यांचे उंबरठे झिजवत आहे. तुर्तास केळी १४ ते १८ रुपये किलो प्रमाणे खरेदी – विक्री होत आहे.

परिपक्वतेच्या उंबरठ्यावर आलेले हे पीक जास्त दिवस ठेवता येणारे नसल्याने मिळेल त्या दरात विकून मोकळे व्हावे लागते. बागेतून केळीचे घड तोडून जाई पर्यत त्याची काळजी घेण्याची केळी उत्पादकाची जबाबदारी असते. केळीला अळी व डासांच्या प्रादूर्भावापासून जपावे लागते. सध्या केळीला १४ ते १८ रुपये प्रतिकिलो जागेवर भाव मिळत असल्याने केळी उत्पादकांना दुष्काळात अच्छे दिन आले असून केळीची काळजी घेण्यासाठी शेतकरी केळीच्या प्रत्येक घडाला प्लॅस्टिकचे आच्छादन लावत आहेत. केळीच्या घडास प्लॅस्टिक आच्छादन बसविल्यामुळे फळांची मच्छर व डास , अळीपासून बचाव होतो. प्रत्येक ‘घडास’ प्लॅस्टिक पिशवी लावतांना स्वतःसह मजुरांची दमछाक होतांना पाहवयांस मिळते. गतवर्षी मुरमा येथील शेतकऱ्या ची केळी आखाती देश इराक – इराणला पोहचली होती तर त-हाडी येथील कैलास करंके व संजय जाधव या शेतकऱ्यांनी पहिल्याच वर्षी पाच ते दहा लाखाचे केळीचे उत्पादन घेऊन उच्चांक मोडला होता.

कैलास करंके (केळी उत्पादक),”केळीवर नुसते औषधांचा भडीमार करून चालत नाही तर त्याच्या फळांची काळजी घेण्यासाठी प्लॅस्टिकने पूर्ण घड झाकणे फायदेशीर ठरते. एकरी नऊशे रुपये व मजुरीचा पंधराशे रुपये असा एकूण अडी च हजाराचा खर्च येतो, परंतु लाखोचे हानी टाळता येते.”

Views: 205
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डॉ. विजयकुमार पाटील यांची पन्हाळा (कोतोली) येथे प्राचार्यपदी  नियुक्ती.

डॉ. विजयकुमार पाटील यांची पन्हाळा (कोतोली) येथे प्राचार्यपदी  नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)