संकल्प यात्रा अभियात लोकप्रतिनिधीच फिरवली पाठ
तऱ्हाडी येथील संकल्प यात्रा अभियात आला अनुभव
त-हाडी -आपला संकल्प विकसित भारत या संकल्प यात्रेचे त-हाडी येथे बुधवारी (ता-१७) सकाळी १० वाजता आगमन झाले त-हाडी वासियाच्या सह जिल्हा परिषद सदस्य भिमराव ईशी यांच्या हस्ते संकल्प रथाचे पूजन करून वाजता गाजत स्वागत केले
यात्रेदरम्यान आतापर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला नाही अशा नागरिकांशी संवाद अनुभव तसेच या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यातबाबत मार्गदर्शन करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष त-हाडी जिल्हा परिषद सदस्य भिमराव ईशी होते ,लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर. उपसरपंच उज्जनबाई अहिरे, पोलीस पाटील प्रतापसिंह गिरासे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे, ग्रामविकास अधिकारी देवीदास धांडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाकळे, पिकं संरक्षण सोसायटी चेअरमन विलास भामरे यांच्या माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच ओंकार पाटील, अशोक सोनवणे माजी चेअरमन संजय जाधव हस्ते प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली
अध्यक्ष भिमराव ईशी म्हणाले शासनाच्या योजना तालुक्यासह ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोचविणे शासनाचे कामं आहे गरजु लाभार्थींना लाभ मिळुन देण्यासाठी प्रशासनासह सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य अधिकारी फुलपगारे यांनी आरोग्य व स्वच्छता विषयी, आयुष्यमान कार्ड आभा कार्ड,माहिती दिली शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली विकसित भारत संकल्प यात्राचा कार्यक्रमात गावातील नागरिक उपस्थित असताना महसूल विभाग, कृषी विभागातर्फे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी या़नी पाठ फिरवल्याने असे चित्र दिसून आले शिरपूर तालुक्यातील पश्चिम परिसरातील तऱ्हाडी मोठे गाव आहे दोन जिल्ह्यांमध्ये वसलेले गाव आहे लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करणे आवश्यक होते कार्यक्रमाचे सांगता प्रतिज्ञा घेऊन केला
या कार्यक्रमाला गावातील सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उज्जनबाई अहिरे पोलीस पाटील प्रतापसिंह गिरासे तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भामरे ग्रामविकास अधिकारी देवीदास धांडे सामाजिक कार्यकर्ते सुनील पाकळे पिकं संरक्षण सोसायटी त-हाडी चेअरमन विलास भामरे, कृषी सहायक महेंद्र पाटील ललित पाटील भावनेश पाटील किरण भामरे, अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेवक आरोग्य सेविका या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी देवीदास धांडे, आत्माराम बागुल, शिवाजी पाटील भावनेश पाटील, नितीन भामरे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले







