मराठी भाषा दिना निमित्ताने तात्यासाहेब वि.वा.शिरवाडकरांना अभिवादन
कोंढावळ -प्रतिनीधी
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलीत,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात “मराठी भाषा दिना ” निमित्ताने तात्यासाहेब वि.वा.शिरवाडकरांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात – गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकाराने करण्यात आली. याप्रसंगी वि वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेस जेष्ठ शिक्षक धनराज जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून शिरवाडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले.प्रमोद परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमात मराठी विषय शिक्षक म्हणून उपशिक्षक प्रमोद परदेशी यांनी कुसुमाग्रजांच्या काव्य आणि नाट्यलेखनातील राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणीवा याविषयीचे मत मांडताना क्रांतीचा जयजयकार या कवितेतला राष्ट्रभाव, तसेच नटसम्राट या नाटकामधील नात्यातील भावसंबंध स्पष्ट केला. तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या साहित्य लेखनातून एक नवी प्रेरणा ,उत्साह वाचकांना प्राप्त होतो असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कैलास सैंदाणे यांनी केले. कार्यक्रमासाठी जिभाऊ माळी.,रोहिदास खैरनार, योगेश शिंपी, सुलोचना सोनवणे , मंदाकिनी माळी , गोरखनाथ वाल्हे यासह शिक्षकेतर कर्मचारी रविंद्र माळी, रविंद्र बागुल, स्वप्नील बैसाणे व विद्यार्थी वर्ग यावेळी उपस्थित होते.