क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक विज्ञान शिक्षक योगेश शिंपी यांनी विज्ञान दिन साजरा करण्याचे प्रयोजन सांगत विज्ञानामुळे आपल्या जीवनात अमुलाग्र बदल झाले असून विज्ञानाच्या प्रगती मूळे मानवी जीवन समृद्ध झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमचे अध्यक्ष मुख्यध्यापक जिभाऊ माळी यांनी सर सी व्ही रामन यांच्या विषयी माहिती दिली व रामन इफेक्ट काय आहे ते सांगत प्रत्येकाने विज्ञानाचा अभ्यास करावा व जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करावा त्याशिवाय ज्या अंधश्रद्धा आहेत त्या नाहीश्या होणार नाहीत असे सांगत एक लोटा जल सब दुःख का हल सारखे भ्रामक विचार डोक्यात येणार नाहीत असे सांगितले.
त्या नंतर विद्यार्थ्यांनी विविध अंधश्रद्धा समाजात आजही आहेत. त्या समस्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शनखाली विविध विषयावर म्हणजे 1)पाऊस पाडणे, हवेचा दाबाचा उपयोग करून,2)आत्मा जागृत करणे,हात चलाखीने 3)तरंगणारे अंडे,पदार्थाची घनता चा उपयोग करून,4)ध्वनीचे प्रसारण 5) ध्वनीची निर्मिती 6) पाण्यापासून वस्तू तयार करणे,हात चलाखी 7)पाण्यापासून दिवा पेटविणे, 8)मिड ब्रेन ऍक्टिव्हशन 9)नजर उतरविणे असे विविध प्रयोग सादर करून उपस्थितांची मन जिंकली. त्यात इ. आठवीचे विद्यार्थी हितेश माळी, केतन मराठे तसेच इ. नवीतील विद्यार्थी नितीन माळी, तुषार माळी, महिमा माळी, प्राजक्ता माळी, गायत्री गंगावणे, पदमिनी माळी, दिव्या माळी, राधिका माळी, प्रतीक्षा माळी या विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले.कार्यक्रमाला उपशिक्षक प्रमोद परदेशी, रोहिदास खैरनार, धनराज जगताप, गोरखनाथ वाल्हे, कैलास सैंदाणे, सुलोचना सोनवणे, मंदाकिनी माळी तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी रविंद्र माळी, रविंद्र बागुल, स्वप्नील बैसाणे उपस्थित होते.







