मतदानाची टक्केवारी वाढवणे साठी त-हाडी येथे बी.एल.ओ.करता आहेत जनजागृती….
त-हाडी
येत्या १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी त-हाडी गावात जि.प शाळेचे सर्व शिक्षक,अंगणवाडी कार्यकर्त्या,मदतनीस,आशा वर्कर,आरोग्य केंद्राचे कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी यांची नुकतीच एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.शासन धोरणनुसार व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या सूचनेनुसार गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांना भेटी देऊन,आव्हान पत्रके वाटून आपल्या गावातील मतदानाची टक्केवारी वाढवणे संदर्भात बी.एल.ओ.तथा प्रशासकीय अधिकारी आर, जी ,पावरा ग्रामविकास अधिकारी देवीदास धांडे,यांनी सखोल माहिती दिली.व वेग वेगळे कर्मचारी गट तयार करून गावात जागृती करण्याचे नियोजन आखून दिले.त्याप्रमाणे प्रत्येक घरी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच प्रत्येक मतदाराला व्होटर स्लिप देऊन पोहच घेतली जात आहे.या कामी त्यांना शिरपूर तालुक्याचे बी.डी.ओ ,गटशिक्षणाधिकारी गणेश सुरवडकर,संपर्क, अधिकारी प्रशासक दिपक देसले यांचे मार्गदर्शन मिळत आहे.गावात जागृती साठी तुळशीराम भामरे, सुनील धनगर. भावनेश पाटील, शिवाजी पाटील आत्माराम बागुल , ओंकार पाटील,विशाल करंके भुषण बागुल रावसाहेब चव्हाण यांच्या सह पोलीस पाटील प्रतापसिंह गिरासे व शासकीय सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
–