तऱ्हाडी विद्यालयाचा अभाणपूर येथे पालक मेळावा संपन्न
तऱ्हाडी:-स्व.आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी च्या वतीने अभाणपूर येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता या पालक मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी पालक धर्मा चंद्रसिंग भिल होते.या वेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे. संचालिका उज्वला भामरे. संचालक प्रशांत भामरे. मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण. व ज्येष्ठ शिक्षक भरत मराठे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व अभाणपूर येथील पालक उपस्थित होते पालक मेळाव्यात अभाणपूर येथील विद्यार्थी उपस्थिती वाढविणे .
यावर्षीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांनच्या खात्यात जमा करणे व जमा करते वेळी येणाऱ्या अडचणी पालकांना पर्यंत पोहोचवणे.शालेय शैक्षणिक साहित्य वाटप अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास पास वाटप शाळाबाह्य विद्यार्थी शोध घेणे.इयत्ता विद्यार्थ्यीनी गळती बाबत पालकांना शिक्षक भरत मराठे व मुख्याध्यापक आर एस चव्हाण यांनी मार्गदर्शन केले व पालकांच्या व समस्या जाणून घेतल्या
. यावेळी पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले आभार वसंत पाटील यांनी मानले पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी भावेश पाटील प्रवीण शिंदे संतोष आडगाये यांनी प्रयत्न केले







