प्रति पंढरपूर बाळदे येथे आज यात्रोत्सव
(त-हाडी वार्ताहर) शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यात्रा उत्सवाचे आयोजन श्री तापी परिसर विठ्ठल धाम ट्रस्ट बाळदे यांनी केले आहे. पहाटे चार वाजता महाअभिषेक, पूजा, काकडा आरती, भजन, देवाचे दैनंदिन आरती, श्रीविष्णू सहस्रनाम पठण, पालखी सोहळा-दिंडी सोहळा, ग्रंथ वाचन, प्रवचन, हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर मंदिरात सुरू असणार आहेत.
पांडुरंगाची महापूजा धुळे जिल्हाधिकारी श्री अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारीश्री.विशाल नरवाडे आमदार माजी शालेय शिक्षण मंत्री . अमरीशजी पटेल
आमदार. काशीरामजी पावरा पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे माजी नगराध्यक्ष
भूपेशजी पटेल माध्यमिक शिक्षणाधिकारी.मनीषजी पवार तहसीलदार महेंद्र माळी,शिरपूर, उपविभागीय अधिकारी.शरद मडळीक
गटविकास अधिकारी श्री.संजय सोनवणे विभागीयभागवत सोनवणे पोलीस निरीक्षक के. के. पाटील शिरपूर, आदी मान्यवरांच्या हस्ते श्री पांडुरंगाची महापूजा आरती व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत
आज रात्री ठीक ८.३० वा.आचार्य भगवानजी महाराज मालपूरकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल
अनिरुद्ध बाबा अकॅडमी मुंबई यांचे शिरपूर येथील दोनशे स्वयंसेवक मंदिरात सालाबादप्रमाणे सेवा देत असतात.
श्री तापी परिसर विठ्ठल धाम ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार वारकरी भूषण संभाजीराव हिरामण पाटील, सचिव निंबा पाटील, माजी जि. प. सदस्य जितेंद्र कुवर, विश्वस्त दुष्यंत मनोहर पाटील, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय पळासनेर व ग्रामस्थ मंडळी यात्रेची तयारी करीत आहेत.







