दत्तात्रय शिंदे यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रदान
पालघर ( प्रतिनिधी )
नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या के. टी. एच. एम महाविद्यालयातील मराठी विभाग व संशोधन केंद्रातील संशोधक दत्तात्रय शिंदे यांना नुकतीच दि.२८ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विषयातील पीएच. डी. पदवी जाहीर केली आहे. येवला येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१८ते २०२३या कालावधीत संशोधन करून त्यांनी ‘पालघर जिल्ह्यातील वारली, धोडिया व कोकणा बोलीभाषेतील लोकसाहित्य’ या विषयावरील प्रबंध पुणे विद्यापीठास सादर केला होता.
या मौखिक परीक्षेसाठी अंतर्गत परीक्षक म्हणून पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे तर बाह्य परीक्षक म्हणून संत मुक्ताबाई आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मुक्ताईनगर जळगाव येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप माळी तसेच मार्गदर्शक प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे आदी विषय तज्ञ उपस्थित होते. दत्तात्रय शिंदे यांना संशोधन कामी त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार, मराठी संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेश जाधव, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वरखंडा येथील शांतिकुमार आदिवासी विद्यामंदीर शाळेतील उपक्रमशील तसेच आदर्श शिक्षक अशी त्यांची ओळख आहे.
त्यांच्या या यशाबद्दल ज्ञानमाता शाळा समूहाचे विद्यमान संस्थासंचालक फादर निलम लोपीस, माजी संस्थासंचालक फादर योहान अल्फान्सो,विद्यमान शाळासंचालक फादर सॅबी कोरिया,माजी शाळा संचालक फादर जॉयकीम टेलीस, मुख्याध्यापिका मीना सांबर तसेच ज्ञानमाता संस्थेचे आजी माजी मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सहकारी संशोधक मित्र आणि मित्रपरिवारातर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डाॅ. शिंदे म्हणाले की ,
पंचवीस वर्षा पासून पालघर जिल्हा ही माझी कर्मभूमी आहे. येथील आदिवासी समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून वारली, धोडिया व कोकणा समाजातील लोकसाहित्याचा अनमोल ठेवा जतन व संवर्धनासाठी केलेले हे संशोधन म्हणजे या समाजाचे ऋण फेडण्याचा माझा हा अल्प प्रयत्न आहे. आदिवासी समाजातील संशोधक तरुणांनी या कामी पुढाकार घ्यावा ही अशी अपेक्षा डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केली.