त-हाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना अभिवादन
त-हाडी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तिथीनुसार असणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन तऱ्हाडी पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन भगवान डांबरे व व्हा.चेअरमन शिवराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सुतगिरणीचे संचालक सुदाम नथ्थू भलकार, माजी उपसरपंच अशोक सोनवणे, त-हाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष तुळशीराम भामरे यांनी आपल्या मनोगतातून अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला उजाळा दिला.
त्या प्रसंगी कार्यक्रमाला माजी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल डांबरे, माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सुभाष भामरे, बालु सोनवणे, पोलीस पाटील प्रताप गिरासे, किरण भामरे, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाकळे, सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके, सामाजिक कार्यकर्ते भूषण बागुल, भगवान जाधव, किरण अहिरे, गौतम अहिरे,अशोक भामरे, चुडामण भामरे, संजय सोनवणे, नारायण भलकार, माजी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत कदम, त-हाडी विकास सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. उदय भलकार, माजी ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार, भिका भलकार, सागर सोनवणे, चेतन पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्हार सेनेचे अध्यक्ष सुदाम न्हाळदे, उपाध्यक्ष सुरेश पाकळे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष युवराज भलकार, रावसाहेब भलकार, रघुनाथ भलकार, मुकेश भलकार, महेंद्र ठाकरे, भाऊसाहेब भलकार, राजेंद्र पाकळे, राजेंद्र भलकार,दिनेश धनगर, दिनेश भलकार,प्रवीण लांडगे ,योगेश पाकळे, दीपक भलकार, भूषण धनगर, संतोष आढगाळे, गणेश लांडगे ,अशोक लांडगे, प्रशांत भलकार सचिन भलकार ,हिरामण न्हाळदे, राहुल भलकार व धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.