दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे मध्ये मोफत वह्या वाटप
जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सदस्य, दक्षिण रत्नागिरी जिल्हा बळीराज सेनेचे युवा अध्यक्ष, रत्नागिरी तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री प्रथमेश गावणकर,श्री संजय बैकर सर, जयगडचे शौकत डांगे,श्री मकरंद घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी श्री गावणकर म्हणाले, संघर्षाशिवाय यश मिळत नाही, चांगले शिक्षण घेवून उज्ज्वल करीयर करा,शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे असे ते म्हणाले.श्री गावणकर पुढे म्हणाले यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याचे केवळ परिस्थिती नाही म्हणून शिक्षण थांबणार नाही, पैसे नाहीत म्हणून वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत. यापुढे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र सर्वतोपरी सहकार्य करेल असे स्पष्ट केले.
श्री संजय बैकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री बैकर यांनी जिजाऊ च्या माध्यमातून अनेकविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम अव्याहतपणे सुरु ठेवणार असल्याचे सांगितले. यापुढे ही असे अनेक शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवले जाणार असल्याचे सांगितले.
श्री गावणकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रशालेच्या वतीने शाल,श्रीफळ व बुके देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक दिनानिमित्त दि मॉडेलच्या सर्व शिक्षकांचा श्री गावणकर यांनी गुलाबपुष्प देवून शुभेच्छा दिल्या.
सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी केले .तर आभार विनोद पेढे यांनी आभार मानले.